

कन्नड तालुक्यात आज (दि. ८) तीन वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यावेळी जेहुर ठाकरवाडी व उंबरखेडा येथे वीज पडून एकूण १५ जनावरांचा मृत्यु झाला आहे.
जेहुर ठाकरवाडी येथील पुंजाराम गंगाराम मधे यांच्या मालकीचे पाच गाय, तीन वासरु, अंबादास ताना मेंगाळ यांचा एक बैल, शिवराम पेला मेंगाळ दोन गाय एक वासराचा यामध्ये समावेश आहे. तसेच उंबरखेडा येथील अविनाश नामदेव निकम यांच्या दोन म्हैशी एक वासरू यांच्यावर वीज पडल्याने जागीच मृत्यु झाला.
पशुधनाची संख्या कमी आसल्याने जनावरांना मोठी किंमत असून वीज पडल्याने शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे.
हे ही वाचलं का?