आमदार संतोष बांगर शिंदे गटात गेल्यामुळे तालुक्यातील शिवसैनिक संभ्रमात

आ. बांगर
आ. बांगर

हिंगोली, पुढारी वृत्‍तसेवा : राज्यात सत्ता बदल हा शिवसैनिकांच्याजिव्‍हारी लागला आहे. पक्षप्रमुखांच्या विरोधात जाऊन तब्बल 40 आमदारांनी जो बंड केला. त्या बंडांचा अनेक जागेवर मोठ्या प्रमाणात विरोध झाला जागोजागी निदर्शने करत घोषणाबाजी ही झाल्या. पण हिंगोली जिल्ह्याचे खासदार व कळमनुरी विधानसभेमधले आमदार हे मात्र पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे दिसून आले.

आमदार संतोष बांगर यांनी तर बंडखन न करणाऱ्या आमदारा विरोधात धडक मोहीमच राबविले. अनेक जागी सभा घेत खडे बोल सुनावले. वेळेला काडी लावण्यापासून तर बंड करणाऱ्या आमदारांचे लेकर बिन लग्नाचे राहतील असे रोखठोक वक्तव्य केले. 50 ,100 तर कुणाला 200 कोटी रुपये देण्याचा आरोपही त्यांनी केला.

या वक्तव्यामुळे आमदार संतोष बांगर हे चांगलेच चर्चेत आले होते. यांची एकनिष्ठतेचे प्रमाण म्हणून आमदार संतोष बांगर यांच्या समर्थनात अनेक कार्यकर्त्यांनी फेसबुक पोस्ट केल्या होत्या. पण अशातच विधानसभेत शिंदे गट व भाजप यांना बहुमत सिद्ध करण्याअगोदरच आमदार संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होऊन तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यालाच मोठा धक्का दिल्यामुळे संपूर्ण तालुक्यातील शिवसैनिक संभ्रमात पडलेले दिसून आले.

नेमकं जायचे कोणाच्या पाठीमागे आमदार संतोष बांगर यांच्या की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आमदार संतोष बांगर अचानक शिंदे गटात सामील झाल्यामुळे अनेक राजकीय सूत्र बदलतील का ह्याकडे आता तालुक्यातीचे लक्ष लागले आहे. नगरपंचायत सेनगाव अनेक ग्रामपंचायती किंबहुना स्थानिक स्वराज्य च्या निवडणुका ही तोंडावर येऊन ठेपले आहेत अशातच आमदार बांगर यांनी बंड केल्यामुळे पुढचे चित्र काय असणार याची चर्चा सध्या तालुका भर होत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news