श्री संत गजानन महाराज पालखीचे हिंगोलीत स्‍वागत

श्री संत गजानन महाराज पालखी
श्री संत गजानन महाराज पालखी

हिंगोली, पुढारी वृत्‍तसेवा : शेगावच्या श्री संत गजानन महाराज पालखीचे गुरुवारी सकाळी रिसोडमार्गे मराठवाडात आगमन झाले. पान कनेरगाव येथे भाविकांनी भर पावसात श्रीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. कोरोनाच्या दोन वर्षाच्या निर्बंधानंतर या वर्षी अनेक पालख्या पंढरपूरकडे रवाना झालेले आहेत. गण गणात बोते, जय हरी विठ्ठल, आणि गजानन नामाचा जयघोष करीत श्री संत गजानन महाराजांची पालखी आज मराठवाड्यात दाखल झाली आहे.

आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक विठू माऊलीच्या भेटीसाठी पंढरपूरला येतात. या पालख्यामध्ये विदर्भातून सर्वात मोठी पालखी संत गजानन महाराजांची असते. आज या पालखीचे हिंगोली जिल्ह्यात आगमन झाले आहे. मोठया उत्साहात ठिकठिकाणी या पालखीचे स्वागत करण्यात येत आहे.

या पालखी सोहळ्यामध्ये सातशे वारकरी सहभागी आहेत. ही पालखी 5 जिल्ह्यातून जाणार असून तब्बल 750 किलोमीटर अंतर पार करून आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचणार आहे. वारकऱ्यांची शिस्तीत चालणारी पावलं पालखीची ओळख आहे. आज या पालखीचा पहिला मुक्काम सेनगाव येथे असणार असून उद्या सकाळी ही पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news