वाशिम : जिल्‍हा उपनिबंधकाला ६ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले

ला ६ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
ला ६ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

वाशिम ; अजय ढवळे प्राथमिक चौकशीचा (कसुरी अहवाल) अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने अनुकूल पाठवण्यासाठी दिग्विजय राठोड, (जिल्हा उपनिबंधक वर्ग १, सहकारी संस्था वाशिम,) यांनी ९,००,००० रुपये लाचेची मागणी केली होती. त्यातील उर्वरित ६ लाख रुपयांची लाच घेताना अकोला एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. ही घटना ६ जून रोजी संध्याकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तिरुपती सिटी वाशिम येथे घडली.

मंगरूळपिर येथील तक्रारदार यांचे विरूध्द सुरू असलेल्या प्राथमिक चौकशीचा (कसुरी अहवाल) अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने अनुकूल पाठवण्यासाठी दिग्विजय राठोड, (जिल्हा उपनिबंधक वर्ग १, सहकारी संस्था वाशिम,) यांनी ९,००,००० रुपये लाचेची मागणी केली होती. दरम्यान तक्रारदार याने त्यामधील २ लाख ५०,००० रुपये अगोदरच पहिली किस्त म्हणून दिले होते.

उर्वरित राहीलेले ६ लाख ५०,००० रुपयांच्या लाचेसाठी राठोड याने तक्रारदाराकडे तकादा लावला होता. उर्वरित रकमेची मागणी करत असल्याबाबत तक्रारदार यांनी दि. ४ जून २०२४ रोजी अकोला येथील अँटी करप्शन ब्युरो येथे तक्रार दिली. नमूद तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक ६ जून २०२४ रोजी पडताळणी कारवाई केली. यावेळी संशयीत आरोपी राठोड यांनी तडजोडीअंती तक्रारदारास ६ लाख रुपये लाच रक्कम मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून ६ जून रोजी सायंकाळी तिरुपती सिटी (वाशिम) येथील सिल्व्हर अपार्टमेंट मध्ये त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी सापळा रचला असता त्यावेळी राठोड यांनी तक्रारदार कडून उर्वरित असलेली ६ लाख रुपये रोख रक्कम स्वीकारली. लगेच राठोड याला रोख रक्कम ६ लाख रुपयांसह ताब्यात घेऊन भ्रष्टाचार प्रकरणी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन येथे रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.

सदरची कारवाई अकोला एसीबी पथकातील पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार, पोलिस अंमलदार दिगंबर जाधव, अभय बावस्कर, संदीप ताले, निलेश शेगोकार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

हेही वाचा :   

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news