छत्रपती संभाजीनगर : कन्नड ग्रामीण पोलिसांनी आवळल्या दुचाकी चोरांच्या मुसक्या; १२ दुचाकी जप्त

छत्रपती संभाजीनगर : कन्नड ग्रामीण पोलिसांनी आवळल्या दुचाकी चोरांच्या मुसक्या; १२ दुचाकी जप्त
Published on
Updated on

कन्नड; पुढारी वृत्तसेवा : दोन दुचाकी चोरट्यांना गुरूवारी ( दि.१०) अटक करून कन्नड ग्रामीण पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल १२ दुचाकी व ठिंबकचे १५ बंडल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परमेश्वर पिका राठोड (वय २२, रा. सीतानाईक तांडा ता. कन्नड) निखिल अनिल जाधव (वय १९, रा. वसंतनगर जि. जळगांव ) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल १२ दुचाकी चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दुचाकी परमेश्वर राठोड व निखील जाधव यांनी चोरल्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक तातेराव भालेराव यांच्या पथकाने या दोघांना ताब्यात घेत चौकशी केली. यावेळी पोलिसी खाक्या दाखवताच या दोघांनी १२ दुचाकी आणि ठिंबक बंडल चोरल्याची कबुली दिली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक तातेराव भालेराव, सहाय्यक उपनिरीक्षक राम बारहाते, बीट जमादार संदिप कनकुटे, धिरज चव्हाण, रविंद्र ठाकुर, उदलसिंग नागलोत, हर्षवर्धन काळे, यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.

 हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news