परभणी: गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

परभणी: गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Published on
Updated on

चारठाणा; पुढारी वृत्तसेवा: मंठा – सेलू मार्गावर गिरगाव पाटीजवळ अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांविरोधात चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली. राम दगडूबा राखुंडे (रा. देऊळगाव, ता. सेलू), कृष्णा मदन मिसाळे (रा. इंदिरानगर, मंठा) अशी गुन्हा दाखल केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून चारचाकी वाहन, गुटखा, मोबाईल असा एकूण ५ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी, चारठाणा पोलिसांना एका वाहनाद्वारे अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी गिरगाव पाटीजवळ मंठा येथून सेलू कडे जाणारे (एमएच २२ एन २४४८) वाहन रोखले. या वाहनाची झडती घेतली असता त्यात वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा आढळून आला.

ही कारवाई चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक विनोद साने मगरे, कोणार्डे बीट जमादार कोंढरे, चालक भालेराव शेख जिलानी, पवन राऊत यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद साने करीत आहेत.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news