संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅव्हल्सचा अपघात

संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅव्हल्सचा अपघात

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी बारामतीहुन संभाजीनगरात येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सचे टायर फुटल्याने बस दुभाजकावरुन विरुद्ध दिशेला जाऊन धडकली. मात्र या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील लिंबेजळगाव जवळ शुक्रवारी (दि.२३) दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला.

साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी चौधर परिवार बारामतीहून संभाजीनगरकडे खाजगी ट्रॅव्हल्स बसने (एम. एच. २५२५) येत होते. बीड बायपास परिसरात आले असता आचानक बसचा टायर फुटला. यामुळे ही बस विरूद्ध दिशेला जाऊन एका कंपाउंड वालला धडकली. महामार्गावर एकही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. अपघात होताच येथील सुदर्शन गवळी सह कर्मचाऱ्यांनी धावाधाव करीत बसमधील सर्व प्रवाशांना बसच्या बाहेर काढले.

      हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news