बीड : रमेश नेहरकरच्या नातेवाईकांचा मृतदेहासह पाोलीस ठाण्‍यात ठिय्‍या, मारेकर्‍यांना अटक करण्‍याची मागणी

बीड : रमेश नेहरकरच्या नातेवाईकांचा मृतदेहासह पाोलीस ठाण्‍यात ठिय्‍या, मारेकर्‍यांना अटक करण्‍याची मागणी
Published on
Updated on

केज (बीड) : पुढारी वृत्तसेवा 

रमेश नेहरकर यांच्‍या खुन्‍याला अटक केल्‍याशिवाय त्‍यांच्‍या पार्थिवावर अंत्‍यसंस्‍कार करणार नाही, असा पवित्रा घेत नेहरकर यांच्‍या नातेवाईकांनी मृतदेहासह पाेलिस ठाण्‍यात ठिय्‍या आंदाेलन केले.

तुझ्या मुलीचे लग्न माझ्यासोबत का लावून देत नाही? अशी विचारणार करत संशयित आरोपी भागवत चाटे आणि त्याच्या मित्रांनी मोटरसायकलीवरून पाठलाग करत रमेश नेहरकर यांच्‍यावर हल्‍ला केला होता. उपचारासाठी त्यांना लातूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी रमेश नेहरकर यांचा मृतदेह केज पोलीस ठाण्यात आणून ठेवला. आरोपी भागवत चाटे याला अटक करा, अन्यथा मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका त्‍यांच्‍या कुंटुंबियांनी घेतली.

या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे पोलीस ठाण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक कुमावत नेहरकर यांच्‍या  नातेवाईकांशी चर्चा करत आहेत. आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांनी दिला आहे.

हेही वाचलंत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news