Tokai Sugar Factory: टोकाई साखर कारखान्यावर ॲड. शिवाजी जाधवांचे वर्चस्व कायम

Tokai Sugar Factory: टोकाई साखर कारखान्यावर ॲड. शिवाजी जाधवांचे वर्चस्व कायम
Published on
Updated on

वसमत, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या (Tokai Sugar Factory) निवडणुकीत स्वकियांच्या विरोधानंतरही भाजपचे ॲड. शिवाजी जाधव यांनी कारखान्यावर वर्चस्व सिध्द केले. ॲड. जाधव यांच्या गटाला 16 तर विरोधी पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या (Tokai Sugar Factory) संचालकांच्या 17 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी भाजपचे ॲड. शिवाजी जाधव यांनी ॲड. शिवाजी जाधव शेतकरी विकास पॅनल उभे केले होते. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे गट) यांनी टोकाई शेतकरी विकास पॅनल उभे केले होते. तर काँग्रेसने ६ जागेवर आपले उमेदवार उभे केले होते. निवडणुकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत असलेल्या १३ कोटींच्या एफआरपीचा मुद्दा कळीचा ठरला होता.

माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, आमदार राजेश नवघरे यांच्यासह भाजपच्याच काही पदाधिकाऱ्यांनी ॲड. जाधव यांच्या पॅनलच्या विरोधात प्रचार केला. तर ॲड. जाधव यांनी एकहाती किल्ला लढविला होता. दरम्यान, निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. यामध्ये 5268 ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मतदान केले. त्यानंतर मंगळवारी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार शारदा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी सुरु केली. यामध्ये सर्वात पहिला निकाल विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा जाहीर झाला. यामध्ये टोकाई शेतकरी विकास पॅनलचे खोब्राजी नरवाडे विजयी झाले.

मात्र, त्यानंतर सर्व 16 जागांवर ॲड. शिवाजी जाधव शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले. यामध्ये ॲड. शिवाजी जाधव, माजी आमदार मुंजाजीराव जाधव, शिवाजी इंगोले, मनोज कन्नेवार, रावसाहेब कऱ्हाळे, विलास नादरे, सुनील बागल, शिवाजी सवंडकर, जगदेवराव साळुंके, गजानन जाधव, साहेबराव पतंगे, विट्ठल भोसले, रणधीर तेलगोटे, बायनाबाई कऱ्हाळे, अर्चना सिध्देवार, देवानंद नरवाडे, विश्‍वनाथ जमरे यांचा समावेश आहे. या निवडणुकीमध्ये पी. आर. देशमुख त्यांच्या पत्नी इंदूमती देशमुख तसेच माजी सभापती अंबादास भोसले व त्यांचे भाऊ विठ्ठल भोसले, राजाराम खराटे व त्यांचे भाऊ अशोक खराटे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

कारखाना कोण चालवू शकतो, कोण थकीत रक्कम देऊ शकतो, हे सभासदांना कळाले आहे. कारखान्याचा गळीत हंगाम सुरळीत सुरु ठेवला. त्यामुळे सभासदांनी आमच्यावर विश्‍वास टाकला आहे. सभासदांच्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही. लवकरच एफआरपीची रक्कम दिली जाईल.

– ॲड. शिवाजी जाधव

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news