हिंगोली: वारंगा फाटा येथे दुचाकी अपघातात दोन ठार; एक जखमी | पुढारी

हिंगोली: वारंगा फाटा येथे दुचाकी अपघातात दोन ठार; एक जखमी

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे दुचाकीला झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. तर एक जण जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास नांदेडकडून वारंगाकडे एका हॉटेल समोर दुचाकीचा (एमएच २६-०६२६) अपघात झाला. यामध्ये मयूर केशवराव दुबे (वय २२, रा. शुक्रवारपेठ, वाशिम) याचा जागीच मृत्यू झाला. तर विष्णू बालाजी पाटील (वय २२, रा. शिवनी बुद्रुक, जि. लातूर) याचा नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही माहिती वारंगाफाटा पोलिस मदत केंद्राचे बीट जमादार रोहिदास राठोड यांनी दिली. अन्य एक जण जखमी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, त्याचे नाव समजू शकलेले नाही.

हेही वाचा 

Back to top button