हिंगोली : धोंडी धोंडी पाणी दे, रान हिरवगार होऊ दे; वरूणराजासाठी शेतकऱ्यांचे देवाला साकडे | पुढारी

हिंगोली : धोंडी धोंडी पाणी दे, रान हिरवगार होऊ दे; वरूणराजासाठी शेतकऱ्यांचे देवाला साकडे

गोरेगाव ; पुढारी वृत्‍तसेवा रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी गोरेगाव येथे धोंडी धोंडी पाणी दे शेतकऱ्यांच रान हिरवगार होऊ दे दाणा दाणा टिपु दे म्हणत अशी आर्त हाक मारुन देवी देवताला साकडे घालण्यात आले.

मृग आणि आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याने जिल्ह्यात दुष्काळाचे ढग घोंघावत आहेत. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. यंदाच्या वर्षी चांगल्या प्रकारे वरुणराजा बरसणार पीक पाणी चांगले होईल या आशेने शेतकऱ्यांनी खत बियाणांची जुळवाजुळव करून ठेवली आहे. पाऊस वेळेवर होईल या अंदाजाने शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाला होता.

मृग नक्षत्राच्या शेवटच्या आठवड्यात अल्पशा पावसावर १० टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र तब्बल पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्याने उर्वरित पेरण्या खोंळबल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली अशांचे अंकुर लेले पाण्याअभावी शेवटची घटका मोजत आहेत. त्यामुळे ज्यांनी पेरले त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. मृग नक्षत्र व आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याने रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी युवकांनी कंबरेला बेंडुक लिंबाचा पाला अर्धनग्न होऊन डफड्याच्या तालावर गावात फिरुन धोंडी धोंडी पाणी दे चागला पाऊस होऊ दे शेतकऱ्यांच रान हिरवगार होऊ दे दाणा दाणा टिपु दे अशी आर्त हाक देत देवी देवाला साकडे घातले आहे.

हेही वाचा : 

Back to top button