राज्यातील जनतेला सुखी, समाधानी ठेव; महसूलमंत्र्यांचे रेणुका मातेला साकडे

राज्यातील जनतेला सुखी, समाधानी ठेव; महसूलमंत्र्यांचे रेणुका मातेला साकडे

श्रीक्षेत्र माहूर; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्रातील सर्व जनतेला सुखी, समाधानी ठेव, त्यांना उत्तम स्वास्थ्य लाभू दे, शेतकरी सर्वार्थाने सुखी होऊ दे, असे साकडे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी श्री रेणुका मातेला घातले. घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंदिरात जाऊन सपत्निक श्री रेणुका मातेची विधिवत पूजा अर्चा केली. विधीचे पौरोहित्य वेशासं अरविंद देव व विजय आमले यांनी केले. मंदिर कार्यालयात संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश शशिकांत बांगर, सचिव तथा सहायक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पूजार, कोषाध्यक्ष तथा तहसिलदार किशोर यादव आदीसह विश्वस्त मंडळी उपस्थित होती.

श्री रेणुका माता मंदिराच्या पायथ्याशी श्री रेणुका माऊली व्यापारी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष दिगंबर घोगरे पाटील, उपाध्यक्ष गोविंद आराध्ये, विनोद भारती आदींनी मंत्री विखे -पाटील यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी  विखे-पाटील म्हणाले की, यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांसह नदी नाल्याकाठची जमीन खरडून गेली आहे. याबाबतची नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तपणे चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी त्यांचेसमवेत खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माहूरचे योगी प.पू. श्यामबापू भारती महाराज, विजय आमले, समर त्रिपाठी, पद्मा गिऱ्हे, अर्चना दराडे, नंदकुमार जोशी, अशोक जोशी, संजय बनसोडे, पुरषोत्तम लांडगे, भागवत देवसरकर, डॉ.पद्माकर जगताप, अविनाश टनमने आदींची उपस्थिती होती.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news