राजेश टोपे : एक फेब्रुवारी पासून १ ली ते ५ वी शाळा सुरू करण्याचा मानस

राजेश टोपे : एक फेब्रुवारी पासून १ ली ते ५ वी शाळा सुरू करण्याचा मानस

जालना; पुढारी वृत्तसेवा : १ ली ते ५ वी पर्यंतच्या शाळा १ फेब्रुवारी पासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

जालना येथे प्रजासत्ताक दिनाच्या झेंडा वंदना नंतर माध्यमाशी बुधवारी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आगामी काळात कोरोनाची रुग्ण संख्या व परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येईल. लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग कमी आहे. त्यांना संसर्ग झाला तरी ते लवकर बरे होतात. ब्रिटन आणि फ्रांसच्या प्रधानमंत्र्यानी आता आपल्याला कोरोना बरोबर राहायचे आहे असे म्हटले आहे. त्यामुळे या राष्ट्रापासून बोध घेऊन आगामी काळात टास्क फोर्स आणि केंद्र सरकारच्या सुचनाचे पालन केले जाईल असेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

राज्य, समाज आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी दुसऱ्या डोसचं लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन देखील आरोग्यमंत्री टोपे यांनी केले. कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आल्याची कबुलीही टोपे यांनी दिली. कोरोनामुळे निर्बंध लावण्यात आल्यानं उद्योजकांना नुकसान होत असतानाच महसूल देखील कमी प्रमाणात जमा होत असल्याचे टोपे म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news