Parbhani crime | चुडावा पोलीस हद्दीत आढळला रक्तबंबाळ अवस्थेतील वृद्धाचा मृतदेह

पूर्णा तालूक्यातील कावलगाव शिवारातील घटना; ओळख पटवण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरु
Parbhani crime | चुडावा पोलीस हद्दीत आढळला रक्तबंबाळ अवस्थेतील वृद्धाचा मृतदेह
Published on
Updated on

पूर्णा : तालुक्यातील चुडावा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शेतकऱ्याच्या शेतात वयोवृद्धाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. या भयंकर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान मयताची ओळख पटवणे व मारेकऱ्याचा तपास लावणे? याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार, पूर्णा तालूक्यातील कावलगाव शिवारात शेतकरी गंगाधर पिसाळ यांच्या शेतात सोमवार दि. ३० मार्च रोजी सकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान एका ६० ते ६५ वर्षीय अनोळखी ईसमाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान चुडावा पोलीस ठाण्यात सदरील घटनेची खबर साहेबराव ग्यानोजी पिसाळ यांनी दिली. यानंतर तपास करून पोलिसांनी आ मृ.नं ०५/२०२६ कलम १९४ कायद्यान्वे गुन्हा नोंद केला आहे.

हे वृत्त लिहीपर्यंत सदर मयत ईसमाची ओळख पटली नव्हती. घटना उघडकीस आल्यानंतर घटनास्थळी चुडावा पोलीस दाखल होवून त्यांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी कावलगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवला. घटनास्थळी सदर मयत व्यक्तीच्या काना नाकातून रक्त आले होते. त्याच्या अंगात पांढऱ्या रंगाचा कुर्ता, पांढऱ्या रंगाचे धोतर, डोके दाढी मिशी पांढरे केस, वर्ण गोरा, पायात रबरी काळा बुट अशा वर्णन अवस्थेत मृतदेह मिळून आला आहे.

दरम्यान, सदरील अनोळखी वृद्ध व्यक्ती कोण?, कुठला असेल? त्याचा कोणी घातपात केला असावा का? असे जनतेतून सवाल उठवले जात आहेत. सदर घटना प्रकरणी सपोनि सुशांत किनगे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सपोनि अरुण मुखेडकर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news