ST Employees Protest : परभणीला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित विविध मागण्यांकडे शासनाचे वेधण्यासाठी येथील विभागीय कार्यालयासमोर सोमवारी (दि. 15) घंटानाद आंदोलन करण्यात आले.
ST Employees Protest
ST Employees Protest : परभणीला एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलनfile photo
Published on
Updated on

ST employees' protest in Parbhani

परभणी : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित विविध मागण्यांकडे शासनाचे वेधण्यासाठी येथील विभागीय कार्यालयासमोर सोमवारी (दि. 15) घंटानाद आंदोलन करण्यात आले. यात महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, कामगार सेना, कास्ट्राईब राज्य कर्मचारी संघटना, एसटी कर्मचारी काँग्रेस, वर्कर्स काँग्रेस इंटक, बहुजन कर्मचारी संघटना, राष्ट्रीय मुलनिवासी संघटना पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी झाले होते.

ST Employees Protest
Chhatrapati Sambhajinagar strike impact : महसूलसह घाटी, आरटीओचे कामकाज विस्कळीत

एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक, प्रशासकीय व सेवा विषयक अनेक मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. याबाबत शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे राज्यातील विविध कर्मचारी संघटनांनी एकत्र येत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

आंदोलनाची सुरुवात सोमवारी दि. 15 जून रोजी घंटानाद आंदोलनाने करण्यात आली आहे. सरकारने यावरही कोणता निर्णय न घेतल्यास यानंतर दि.22 जून रोजी आगार स्तरावर गेटसभा घेण्यात येणार असून, 29 जून रोजी धरणे आंदोलन करून शासनाचा निषेध नोंदविण्यात येणार आहे.

ST Employees Protest
Latur News : पंचायत समिती लिपिकांचे कामबंद आंदोलन; नागरिकांची फरफट

या आंदोलनांतून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे संघटना पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे. शासनाने मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. सदरील आंदोलन विभागीय सचिव गोविंद वैद्य यांच्यासह अनेक पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news