Chhatrapati Sambhajinagar strike impact : महसूलसह घाटी, आरटीओचे कामकाज विस्कळीत

प्रलंबित मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचा संप
Chhatrapati Sambhajinagar strike impact
संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात तुरळक कर्मचारीच हजर होते. विभागीय आयुक्त कार्यालयात निदर्शने करताना संपकरी कर्मचारी. (छाया: सचिन लहाने)
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून (दि.२१) पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा मराठवाड्यात मोठा फटका बसला आहे. या संपामुळे महसूल विभागाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून, घाटी व मिनी घाटीतील परिचारिकांच्या सहभागामुळे आरोग्य सेवे-बरही ताण पडला आहे. तसेच आरटीओ कार्यालयातही कर्मचाऱ्याऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे वाहनधारकांची मोठी धावपळ उडाली.

महसूलचे कामकाज पूर्णपणे ठप्प

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत महसूल विभागाचे एकूण ७,०६६ कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी तब्बल ५,६२० कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. ३२० कर्मचारी पूर्वपरवानगीने रजेवर असून, केवळ १,१२६ कर्मचारी कामावर हजर असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाने दिली. विभागीय कार्यालयातील केवळ १७ कर्मचारी संपात सहभागी असल्याचे दिसून आले. मात्र बहुतांश कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आठही जिल्हाधिकारी कार्यालये, सर्व तहसील कार्यालये, उपविभागीय कार्यालये आणि तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांचे कामकाज मंगळवारी दिवसभर ठप्प राहिले. परिणामी, विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले

घाटीत नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अधिसूचना तात्काळ जाहीर करणे, परिचर्या संवर्गातील रिक्त पदे भरणे, पदोन्नती प्रक्रिया राबवणे आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेणे या मागण्यांसाठी घाटी रुग्णालयातील परिचारिका संघटनेने मंगळवारी मकाम बंदफ आंदोलन पुकारले. सकाळी नर्सेस हॉस्टेल परिसरात जोरदार घोषणाबाजी करत शासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. या संपामुळे ओपीडीसह नियमित सेवांवर मोठा परिणाम झाला असून, अनेक नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या आहेत.

आमचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी वारंवार निवेदने देऊनही शासनाने दखल न घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे, असे संघटनेच्या इंदूमती थोरात यांनी सांगितले. मात्र रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आपत्कालीन सेवा व महत्त्वाचे उपचार सुरू ठेवण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. आंदोलनात शुभमंगल भक्त, मकरंद उदयकार, प्रवीण व्यवहारे, वंदना कोहिनूरकर, प्रतिभा अंधारे, कालिंदी दाटे, लता सोंडगे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते

Chhatrapati Sambhajinagar strike impact
Kharegaon Flyover Thane MSRDC: खारेगाव उड्डाणपूल तीन दिवसांत सुरू; निकृष्ट कामांवर कारवाईचे शिंदेंचे आदेश

मिनी घाटीतील परिचारिकांचा बेमुदत संपाचा इशारा

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिबा म्हणून मिनी घाटीतील परिचारिका संघटनेने सलग तीन दिवस काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरही मागण्यांवर निर्णय न झाल्यास बेमुदत संपात सहभागी होण्याचा इशारा निवेदनाद्वारे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके यांना देण्यात आला आहे.

आरटीओ कार्यालयात वाहनधारकांची धावपळ

प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातील कर्मचारीही संपात सहभागी झाल्याने काही किरकोळ कामांसाठी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला, दंड भरणे, वाहन सोडवणे आणि वाहन हस्तांतरण (ट्रान्सफर) यासारख्या कामांवर परिणाम झाला. मात्र आरटीओची अनेक कामे ऑनलाईन झाली असल्याने आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी विविध कक्षांचे कामकाज सांभाळल्याने यंत्रणा पूर्णपणे कोलमडली नाही.

काळ्या फिती लावून परिचारिकांचा संपाला पाठिंबा

छत्रपती संभाजीनगर : राज्यव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर घाटीतील परिचारिका फेरडेशनकडून काम बंद आंदोलन केले असताना दुसऱ्या महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना (शासनमान्य), मुख्यालय लातूर या संघटनेकडू मात्र रुग्णसेवा खंडित होऊ नये यासाठी काळ्या फिती लावून काम करत आंदोलनाला समर्थन दिले. संघटनेच्या अध्यक्षा द्रौपदी कर्डिले, सचिव महेंद्र सावळे, विद्या निकुंभ, कविता नवघरे तसेच सर्व पदाधिकारी आणि सभासदांनी सहभाग नोंदविला.

Chhatrapati Sambhajinagar strike impact
Tarapur MIDC Road Work: तारापूर एमआयडीसीत रस्ते कामांचा अवजड वाहनांना फटका

सचिवांच्या चर्चेला नकार, संप सुरूच राहणार अप्पर मुख्य सचिवांनी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना मंगळवारी चर्चेसाठी बोलावले होते. परंतु कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीच निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे आम्ही चर्चेला गेलो नाही. परिणामी, आमचा संप सुरूच राहणार आहे.

भाऊसाहेब पठाण, राज्याध्यक्ष, राज्य सरकारी गट ड कर्मचारी महासंघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news