Accident News| भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसने समोरून येणाऱ्या दुचाकीला ठोकले; एक जण गंभीर जखमी

Accident Death | या अपघातात दुचाकीस्वार फेरोज इमामजी कुरेशी (वय 35, रा. चारठाणा) हा गंभीर जखमी झाला असून, त्याचा कमरेपासून एक पाय गेलेला आहे.
Accident
Accident
Published on
Updated on

चारठाणा प्रतिनिधी

नांदेड–संभाजीनगर राज्य महामार्गावरील चारठाणा जवळ असलेल्या माणकेश्वर पाटी परिसरात, कंधार आगाराची संभाजीनगरहून कंधारकडे जाणारी बस क्रमांक MH 20 BL 1709 ने जिंतूरहून चारठाण्याकडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक MH 21 W 3253 ला समोरासमोर जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार फेरोज इमामजी कुरेशी (वय 35, रा. चारठाणा) हा गंभीर जखमी झाला असून, त्याचा कमरेपासून एक पाय गेलेला आहे.

Accident
Parbhani news: प्रधानमंत्री सडक योजनेतील आशिर्वाद कंट्रक्शनचा असाही प्रताप

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल राठोड, ट्रॅफिकचे जिलानी साहब शेख, हनुमान पावडे, रामकिशन कोंढरे, श्रीकांत कालवणे, कैलास खरात आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जखमीला ॲम्बुलन्समधून जलील इनामदार, शारिक देशमुख, आरिफ कुरेशी, वसीम कुरेशी यांनी जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले.

या अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंना मोठी वाहनांची गर्दी झाली होती. ही गर्दी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल राठोड यांनी हटवून वाहतूक सुरळीत केली.

Accident
Reading Culture : वाचन संस्कृतीसाठी पेंडल मारत परभणी ते मुंबई !

अपघाताची माहिती मिळताच महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायकराव जाधव, पोलीस जमादार संघपाल पारखे तसेच पोलीस मित्र गणेश पालवे घटनास्थळी दाखल झाले.

विशेष म्हणजे, कंधार आगाराची बस भरधाव वेगाने चालवत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे बसमधील प्रवाशांनी सांगितले. बस चालक विष्णू जीवणे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले आहे. घटनेची माहिती मिळताच जिंतूरचे आगारप्रमुख आनंद चव्हाण, वाहतूक निरीक्षक शरद पाटील, लिपिक गजानन घुगे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news