Parbhani news: प्रधानमंत्री सडक योजनेतील आशिर्वाद कंट्रक्शनचा असाही प्रताप

Parbhani news
Parbhani news
Published on
Updated on

पूर्णा: तालुक्यातील गौर ते गोविंदपूर आणि गौरपासून पिंपळगाव लिखा गावापर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाचे कंत्राट प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मे आर्शिवाद कंट्रक्शन कंपनी लातूर यांनी घेतले होते. सदर रस्ता काम मागील दिड वर्षापासून मजबुतीकरण करुन सोडून देण्यात आले. त्यावर डांबरीकरण न करता कंट्रक्शनने कामातून काढता पाय घेतला.

सदरील रस्ता काम पूर्ण करावयाची मुदत एक वर्ष झाले संपूनही डांबरीकरण केले नाही. त्यामुळे सदरील कंट्रक्शनचा असाही प्रताप पहावयास मिळत आहे. यापुर्वी थातूर-मातूर पद्धतीने केलेले प्रथम मजबुतीकरण कामातील गिट्ठी मुरुम उखडून सध्या स्थितीत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यावरुन वाहतूक करणे तारेवरची कसरत बनली. तरीही सबंधीत कंट्रक्शनकडून शिल्लक राहिलेले डांबरीकरणाचे काम केले जात नाही. त्यावर प्रधानमंत्री ग्राम योजनेतील कार्यकारी अभियंता व कामावर नियुक्त असलेल्या बांधकाम इंजिनिअरचे नियंत्रण राहीले नाही.

त्याचबरोबर याच कंट्रक्शनाने पूर्णा ते हिवरा गाव नदीपर्यंत सुमारे ९ किमी अंतराच्या रस्ता मजबुती व डांबरीकरण करण्याचे काम घेतले आहे. सदरील रस्त्यचे प्रथमतः मजबुतीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले.रस्त्यावर अंदाजपत्रकाप्रमाणे ढबर गिट्ठी मेटल न टाकता कमी वापरले. त्यावर माती मिश्रीत चुनखडीयुक्त मुरुम टाकला.तो आता पुर्णपणे उखडून ठिकठिकाणी रस्त्यावर गिट्ठी उखडून अस्तव्यस्त पसरली आहे.त्यावरुन दुचाकी चारचाकी वाहनांची वाहतूक होणं कठीण बाब होवून बसली आहे. पसरलेल्या मोकळ्या गिट्ठीवरुन वाहने चालविणे मुश्किल झाले आहे.अपघाताची शक्यता वाढली आहे. तरी देखील गिट्ठीवर कठीण खडक टाकून दबई केली जात नाही.

याकडे सबंधीत अभियंता ढुंकूनही पाहयला तयार नाहीत. त्यामुळे गुत्तेदार उर्वरित काम करण्यास धजावताना दिसत नाही.सध्या या रस्त्यावरून ऊसाची वाहतूक करणं अथवा ईतरही वाहनं चालवणं अवघड झाले आहे.तेव्हा ह्या रस्त्यावर त्वरित मुरुम तरी टाकून वाहतूक सुरळीत करावी.तसेच गौर ते गोविंदपूर,गौर-पिंपळगाव लिखा या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी या भागातील नागरीकातून केली जात आहे.अन्यथा लवकरच जनतेतून जन आंदोलन छेडण्याची तयारी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news