

Sonpeth Municipal Council Nilesh Rathod Vice President
सोनपेठ: सोनपेठ नगरपरिषदेची पिठासीन अधिकारी तथा नवनिर्वाचित नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.14) नगरपरिषद कार्यालयात संपन्न झाली. या सभेत उपनगराध्यक्षपदाची व स्विकृत सदस्य निवड करण्यात आली आहे.
सोनपेठ नगरपरिषद कार्यालयांत उपनगराध्यक्ष पदांसाठी निलेश राठोड, कल्पेश राठोड व कुशावर्ता झिरपे यांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. यामध्ये कल्पेश राठोड यांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतले असल्यामुळे निलेश राठोड व कुशावर्ता झिरपे यांच्या हात उंचावून मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहेत.
यावेळी निलेश राठोड यांना 12 मते मिळाली तर कुशावर्त झिरपे यांना 8 मते मिळाली. या निवडणुकीत उपनगराध्यक्षपदी निलेश राठोड यांची निवड झाली . तर स्विकृत सदस्य पदांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांची निवड झाली. तर जनसुराज्य शक्ती पक्षांच्या वतीने बळीराम पवार यांची निवड झाली.
सोनपेठ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी निलेश राठोड यांची निवड होताच गुलालाची उधळण करीत फटक्यांची आतिषबाजी व ढोलताशांच्या गजरात शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी आमदार राजेश विटेकर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, अॅड. श्रीकांत विटेकर, उपनगराध्यक्ष निलेश राठोड, नगरसेवक कल्पेश राठोड, नगरसेवक विलास भाग्यवंत, बळीराम काटे, दिगंबर भांडुळे, राम नवले, सचिन मुंडे, रमाकांत राठोड, मुस्तफा शेख उपस्थित होते. निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुख्याधिकारी युवराज पौळ, धम्मपाल किरवले, मुस्ताक शेख, दिलीप परळकर आदींनी सहकार्य केले