illegal cattle transport : बैल तस्करीवर पोलिसांचा घाव; 45 जनावरांची सुटका

आठ वाहनांवर कारवाई ; 55 लाखांचा मुद्देमाल जप्त, चालकांविरोधात गुन्हा दाखल
Selu cattle rescue illegal transport case
सेलू : येथे बैलांच्या वाहतुकीची वाहने पकडल्यानंतर पोलिस कर्मचारीpudhari photo
Published on
Updated on

सेलू ः शहरातील रायगड कॉर्नर परिसरात शुक्रवारी (दि.17) पहाटेच्या सुमारास पोलिसांनी रचलेल्या अचूक सापळ्यात अवैधरीत्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला. या धडक कारवाईत तब्बल 45 गोवंशीय बैलांची सुटका करण्यात आली असून 7 पिकअप व 1 आयशर अशा एकूण 8 वाहनांवर पोलिसांनी ताबा मिळवला. याप्रकरणी संबंधित वाहनचालकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परतूर तालुक्यातील पारडगाव येथून गोवंशीय बैलांना अमानुष पध्दतीने वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच रायगड कॉर्नर परिसरात सापळा रचला.

Selu cattle rescue illegal transport case
Nanded Crime : देहविक्री रॅकेटचा मोठा भांडाफोड; ट्रॅव्हल्स–लॉज कनेक्शनचा संशय गडद

संशयास्पद हालचाली दिसताच पोलिसांनी एकामागोमाग आठही वाहने अडवून तपासणी केली. तपासणी दरम्यान वाहनांमध्ये बैलांना अत्यंत कोंडून, हालचालही करता येणार नाही अशा अवस्थेत गोवंशीय बैलांना भरून नेले जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले.

जनावरांच्या आरोग्याची कोणतीही काळजी न घेता, त्यांना यातना होईल अशा परिस्थितीत वाहतूक केली जात होती. यामुळे मोटार वाहन कायद्याचे तसेच प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंध करणाऱ्या कायद्यांचे स्पष्ट उल्लंघन झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या कारवाईत 45 गोवंशीय बैलांसह इतर मुद्देमाल असा एकूण सुमारे 55 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेली सर्व जनावरे तातडीने जिंतूर तालुक्यातील इटोली येथील गोशाळेत पाठवून त्यांची योग्य काळजी घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

याप्रकरणी संबंधित वाहनचालकांविरुध्द सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून या मागील मोठ्या रॅकेटचा शोध घेण्याच्या दृष्टीने तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Selu cattle rescue illegal transport case
Chandrapur Crime | सावली - मुल परिसरातील घरफोडी प्रकरणातील शेट्टी गँगच्या सराईतास अटक : ११२ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त

पोलीस उपनिरीक्षक राऊत, हवालदार जाधव, तेलंगे, कोपनर, रासकटला व साठे यांनी संयुक्तरीत्या ही मोहीम यशस्वी केली. तपास पोलीस हवालदार तेलंगे व शेख राठोड हे करीत असून, या प्रकरणातील इतर संबंधितांचा शोध सुरू करण्यात आलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news