Chandrapur Crime | सावली - मुल परिसरातील घरफोडी प्रकरणातील शेट्टी गँगच्या सराईतास अटक : ११२ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरची कारवाई
Savali Mool burglary case
Savali Mool burglary case Pudhari
Published on
Updated on

Savali Mool burglary case

चंद्रपूर : सावली व मुल परिसरात घडलेल्या घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरने शेट्टी गैंगशी संबंधित अट्टल गुन्हेगारास अटक केली आहे. नागपूर येथून आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीस गेलेले सुमारे ११२ ग्रॅम सोन्याचे दागिने, अंदाजे १६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली व मुल परिसरात घडलेल्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोलीस स्टेशन सावली यांनी संयुक्तरित्या तपास सुरू केला होता.

Savali Mool burglary case
Chandrapur Tiger News | चंद्रपूर–मुल मार्गावर वाघाचा थरार; शिकार केलेला बैल फरपटत नेताना महामार्ग काही काळ ठप्प

दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष पथक नागपूर येथे रवाना करण्यात आले. तपासादरम्यान घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार शेठ उर्फ रमेश वेलादन शेट्टी (रा. चंद्रपूर, ह.मु. दिघोरी, नागपूर) यास ताब्यात घेण्यात आले.

तपासादरम्यान आरोपीने सावली पोलीस स्टेशन येथील अपराध क्रमांक १०७/२०२६ तसेच मुल पोलीस स्टेशन येथील अपराध क्रमांक २५२/२०२५ मधील घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ) व ३३१ (४) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Savali Mool burglary case
Chandrapur Theft | डॉ. मुंधडा हॉस्पिटलमधील चोरीचा छडा; ६० हजारांची रोकड चोरणाऱ्यास अटक, एक जण फरार

आरोपीने चोरी केलेले सोन्याचे दागिने नागपूर येथील तीन सोनारांकडे विक्री केल्याची माहिती तपासात समोर आली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित सोनारांकडून सोन्याच्या दागिन्यांची लगड जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांचे एकूण वजन ११२ ग्रॅम असून त्यांची अंदाजे किंमत १६ लाख ८० हजार रुपये आहे.

या कारवाईमुळे सावली व मुल परिसरातील घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पुढील तपास सुरू असून आरोपीकडून आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

Savali Mool burglary case
Chandrapur Crime | चंद्रपुरात अवैध ६३ जनावरांची वाहतूक: ५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक दीपक कॉक्रेडवार, बलराम झाडोकार, पोउपनि विनोद भुरले, संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, सचिन मुसळे तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई यशस्वी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news