Nanded Crime : देहविक्री रॅकेटचा मोठा भांडाफोड; ट्रॅव्हल्स–लॉज कनेक्शनचा संशय गडद

रामतीर्थ हद्दीत पोलिसांची धडक कारवाई; ६ महिलांची सुटका, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त
Nanded Crime : देहविक्री रॅकेटचा मोठा भांडाफोड; ट्रॅव्हल्स–लॉज कनेक्शनचा संशय गडद
Published on
Updated on

नायगाव/नरसी : रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नरसी परिसरात सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटवर पोलिसांनी धाड टाकत मोठा भांडाफोड केला. या कारवाईत सहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून ६ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार पीटा कायद्यांतर्गत कारवाईचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) व सुरज गुरव (नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली बिलोली उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांनी कारवाईचे नियोजन केले.

गोपनीय माहितीच्या आधारे नरसी–शंकरनगर मार्गावरील बार अॅन्ड रेस्टॉरंट येथे देहविक्री सुरू असल्याचे समोर आले. पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून खात्री करून घेतल्यानंतर दोन पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला. छाप्यात पहिल्या मजल्यावरील खोलीत देहविक्री व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले.

या कारवाईत संतोष श्रीपत पवळे (३०) व शिवराज श्रीपत पवळे (३५, रा. बालाजीनगर, नरसी) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत सोहेल शेख (रा. पनवेल, मुंबई) हा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. तसेच संबंधित ठिकाणाचा मालक श्रीपत आनंदराव पवळे असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनास्थळावरून ४७,५०० रुपये रोख, ६ मोबाईल (६० हजार रुपये) आणि ‘इर्टिगा’ कार (MH-12 SY-6411) असा एकूण ६,०७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुटका केलेल्या सहा महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुनर्वसनासाठी संबंधित संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले आहे. सपोनि शिंदे यांच्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात पीटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सपोनि विक्रम हराळे यांनी दिली. या धडक कारवाईत बिलोली उपविभागीय पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news