Parbhani News : गौंडगाव येथे अवैध वाळू साठ्यावर छापा

२० ब्रास वाळू, टिप्परसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
Parbhani News
Parbhani News : गौंडगाव येथे अवैध वाळू साठ्यावर छापाFile Photo
Published on
Updated on

Raid on illegal sand deposit in Goundgaon

पाथरी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील गोदावरी नदीकाठावर अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर अखेर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. गौंडगाव शिवारात पाथरीतील पोलिसांनी शनिवारी (दि.१२) सकाळी ७.३५ वाजता छापा टाकत विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्या ठिकाणाहून तब्बल २० ब्रास वाळू व एक टिप्पर असा एकूण ६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान घटनास्थळावरील आरोपी हनुमान हरीभाऊ कोल्हे हा पोलिसांची चाहूल लागताच फरार झाला.

Parbhani News
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणप्रश्नी सरकारला आता संधी नाही

गौंडगाव शिवारातील एका शेत-ाजवळ विनापरवाना वाळू साठवून त्याची अवैध विक्री सुरू असल्याची माहिती पाथरी पोलिसांना मिळाली. यानंतर सहायक पोलिस निरीक्षक अनिल कुरुंदकर यांच्या मार्गदर्शनात पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला.

घटनास्थळी टिपर क्रमांक एमएच ०४, एफएल ६७९१ मध्ये वाळू भरली जात होती. पोलिसांनी कारवाई करत टिप्पर व वाळू असा ६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. कारवाईनंतर सपोनि कुरुंदकर यांच्या फिर्यादीवरून हनुमान हरीभाऊ कोल्हे याच्याविरुध्द पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Parbhani News
Cancer Treatment : कॅन्सरवरील उपचार आता परभणीत

तपास पोलिस उपनिरीक्षक चितळे हे करीत आहेत. तालुक्यातील गौंडगावसह गुंज, नाथरा, मरडगाव व परिसरातील अनेक गावांतून अवैध वाळू उपसा सर्रास सुरू आहे. या व्यवसायात गुंतलेल्या माफियांनी महसूल प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरल्याच्या चर्चा आहेत. यामुळेच महसूल विभागाकडून अशा प्रकारची कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

चार दिवसांत चौथी कारवाई

पाथरी पोलिसांनी गेल्या आठवड्याभरात अवैध वाळू उपसा, वाहतूक व विक्री करणाऱ्या वाहनांवर सातत्याने कारवाया केल्या. सदर कारवाई ही या मालिकेतील चौथी मोठी ठरली आहे. पोलिस प्रशासनाकडून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात अशाच कठोर कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news