Parbhani News : रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत गर्भवतीसह बाळाचाही मृत्यू

परभणी : डॉक्टरांसह पाच जणांवर गुन्हा
Parbhani News
Parbhani News : रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत गर्भवतीसह बाळाचाही मृत्यूFile Photo
Published on
Updated on

Pregnant woman and baby die while waiting for an ambulance

परभणी, पुढारी वृत्तसेवा : सात महिन्यांची गर्भवती महिला उपचारासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल होते. प्रकृती गंभीरमुळे नांदेडला पुढील उपचारासाठी हलविण्याचा सल्ला दिला जातो. मात्र १०८ रुग्णवाहिकेसाठी सात वेळा संपर्क करूनही तब्बल दोन तास रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. दरम्यान, महिलेची प्रकृती अधिकच खालावते आणि अखेर शनिवारी रात्री सुमारे ११ वाजता गर्भवती महिला आणि तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू होतो. याप्रकरणी रुग्णवाहिका चालक, डॉक्टर व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यासह पाच जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Parbhani News
Manvat Crime | मानवतच्या एमडी अंमली पदार्थ प्रकरणी : कळंबच्या नगरसेवकासह 6 जणांना अटक

शेख अमीन शेख अयुब (रा. साठेनगर, नेवाती मोहल्ला, जिंतूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला. फिर्यादींची पत्नी मरजीनाबी अमीन शेख (२२) ही सात महिन्यांची गर्भवती होती. शनिवारी (दि.८) सायंकाळी तिचा रक्तदाब कमी झाला व श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तिला तातडीने जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात महिलेची तपासणी केल्यानंतर तिची प्रकृती लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

त्यानंतर महिलेला नांदेडला नेण्यासाठी १०८ रुग्णवाहिका मिळावी, यासाठी नातेवाइकांनी वारंवार प्रयत्न केले. तब्बल सात वेळा १०८ शी संपर्क साधूनही सुमारे दोन तास रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याचा आरोप आहे. रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास झालेल्या विलंबामुळे नातेवाइकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.

Parbhani News
Parbhani News : मानवतमधील एमडी अंमली पदार्थ प्रकरणाचे धागेदोरे लातूर, बीड, धाराशिवपर्यंत

नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर होत असतानाही उपचार व रेफरल प्रक्रियेत अपेक्षित वेगाने हालचाली झाल्या नाहीत. अखेर शनिवारी रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास मरजीनाबी यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या गर्भातील बाळाचाही मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुहेरी आघात झाला. या प्रकरणी रुग्णवाहिका चालक केशव यादव, मोहम्मद जलाल, डॉक्टर अभिजित इप्पर, डॉक्टर कुलदीप चोरमले, डॉ. वर्मा यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news