Manvat Crime | मानवतच्या एमडी अंमली पदार्थ प्रकरणी : कळंबच्या नगरसेवकासह 6 जणांना अटक

धाराशिव, बीड व लातूर पर्यंत पसरले धागेदोरे
MD Drugs
MD DrugsPudhari File Photo
Published on
Updated on

मानवत : मानवत ते पाथरी या राष्ट्रीय महामार्गा वरील रत्नापूर शिवारात शासनाने प्रतिबंधित केलेला एम डी हा अंमली पदार्थ सापडल्या प्रकरणाचे धागेदोरे स्थानिक गुन्हा शाखा व मानवतच्या पोलीस पथकाने शोधून काढले. शनिवारी ता 8 या प्रकरणी बीड, धाराशिव व लातूर या जिल्ह्यातील एकूण 6 जणांना अटक केली आहे. यामुळे या प्रकरणात अटक झालेल्या आरोपीची संख्या 8 झाली आहे.

मोसीन सलीम मिर्झा वय 38 वर्ष राहणार मोमीन गल्ली कळंब, जिल्हा धाराशिव नगरसेवक, अकीब अक्रम मोमीन वय 30 वर्ष रा बोध नगर लातूर, बाबा मोमीन रफिक वय 32 वर्ष रा लातूर, सय्यद समीर सय्यद शब्बीर रा.भोईगल्ली, परळी वै, शेख सलमान शेख खय्युम रा.काकर मोहल्ला, परळी वै व अयान नासेर पठाण रा. बरकत नगर, परळी वैजनाथ अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत माहीती अशी की, मानवत तालुक्यातील रत्नापूर शिवारात मारुती मंदिरासमोर परभणीच्या स्थानिक गुन्हा शाखा व मानवत पोलिसांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पाथरी येथील अलीम शेख खाजा वय 32 व आंबेजोगाई येथील शाहरुख फिरोज खान पठाण वय 29 या दोघांना शासनाने प्रतिबंधित केलेला 52.38 ग्राम एमडी हा अमली पदार्थ स्कूटर सह जप्त केला होता.

MD Drugs
Manvat Crime | रूढी शिवारातील विहिरीत अज्ञात व्यक्तीने संपवले जीवन!

अमली पदार्थाची किंमत 14 लाख 64,400 इतकी होती. पोलिसांनी या प्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. परभणी ठाणे गुन्हा शाखेचे गजेंद्र सरोदे, मानवतचे प्रभारी पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे व व तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय खिल्लारे यांच्या नेतृत्वाखाली चार पथके अटकेत असलेल्या आरोपीच्या माहितीवरून लातूर, परळी, कळंब या ठिकाणी चौकशी करत होते. शनिवारी तारीख 8 याप्रकरणी वरील सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याने या प्रकरणात आत्तापर्यंत आठ आरोपींची चौकशी सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news