

पूर्णा : तालूक्यातील एरंडेश्वर शिवार झिरोफाटा येथील हायटेक रेसिडेंसीयल स्कुल मध्य १० जुलै रोजी उखळद येथील विद्यार्थीनीचे पालक हभप जगन्नाथ हेंडगे यांना संस्थाचालक पती पत्नीने केलेल्या बेदम मारहाणीत पालकाचा मृत्यू झाला होता. यानंतर, विद्यार्थीनीचे पालक मारहाणीत मृत्यू पावल्याची माहिती मिळताच संस्थाचालक पती पत्नी भितीमुळे पसार झाले. ते अजूनही फरारी असून पूर्णा पोलिसांच्या हाती लागले नाहीत.दरम्यान,सदर घटनेचे गांभीर्य घेताच परभणीचे खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहूल पाटील यांनी उखळद गावी जावून गावकऱ्या समवेत मयत जगन्नाथ हेंडगे यांच्या कुटूंबाचे सांत्वन केले.
यावेळी,खा.संजय जाधव यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत हायटेक रेसिडेंसीयल स्कुलचे संस्थाचालक पती पत्नी यांच्या राक्षशी वृत्तीवर खरपूस समाचार घेत त्यांना पोलीसांनी तात्काळ अटक करावी व त्यांच्या शिक्षणसंस्थेवर सत्ताधारी सरकारने निर्बंध आणावेत अशी मागणी केली . वारकरी सांप्रदयातील किर्तनकार प्रवचनकार व्यक्तीमत्वाचा खून होणे ही अतिशय क्रूर घटना आहे. ती शिक्षणसंस्था कायमची बंद झाली पाहिजे. अशी मागणी शिक्षण मंत्र्यांकडे करणार आहे. तसेच सोमवारी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांनाही भेटून आरोपीला तात्काळ अटक झालीच पाहिजे. या आधी सदर शिक्षणसंस्था चालकाने विद्यार्थ्यांनींशी गैरवर्तन केल्यामुळे विनयभंगाचा गुन्हा नोंद आहे.त्या शिवाय असे काही बरेच काळे कारनामे केले सर्वज्ञात आहे. मुजोर संस्थाचालकास शिक्षा झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असेही खासदार जाधव म्हणाले.
त्याच बरोबर परभणीचे आमदार डॉ. राहूल पाटील यांनी देखील मयत हभप जगन्नाथ हेंडगे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. त्यांनी सांगितले की, सदर घटना प्रकरणी मी विधानसभेत हायटेक शिक्षण संस्थाचालकांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रश्न उपस्थित करुन सरकारला न्यायासाठी जाब विचारणार आहे.