Ganeshotsav 2026 | पाचशे वर्षांची परंपरा असलेला सेलू शहरातील 'मेंढ्या गणपती'

मेंढ्या गणपती म्हणून ओळखला जाणारा हा गणपती भक्तांच्या श्रद्धेमुळे पुढे सिद्धिविनायक म्हणून प्रसिद्धीस पावला.
 Selu Mendhya Ganpati
Selu Mendhya Ganpati Pudhari
Published on
Updated on

Selu Mendhya Ganpati

सेलू : सेलू शहरात पाचशे वर्षांपेक्षाही जास्त परंपरा असलेले सिद्धिविनायक संस्थान हे भक्तांच्या नवसाला पावणारे म्हणून ओळखले जाते. पूर्वी मेंढ्या गणपती म्हणून ओळखला जाणारा हा गणपती भक्तांच्या श्रद्धेमुळे पुढे सिद्धिविनायक म्हणून प्रसिद्धीस पावला. प्रत्येक चतुर्थीला शहरातील नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात येथे येऊन गणरायाचे आवर्जून दर्शन घेऊन आपली मनोकामना देवासमोर मांडतात.

शहरातील गणपती गल्लीमधील अतिशय प्राचीन असलेले हे देवस्थान नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखले जाते. पूर्वी हे मंदिर मातीचे होते, सभोवताली धनगर समाज मोठ्या संख्येने असल्याने साहजिकच शेळ्या व मेंढ्यांचे वास्तव्य येथे होते. यामुळे या गणपतीला मेंढ्या गणपती म्हणून ओळखले जात होते. पूर्वी या मंदिरात वास्तव्य नव्हते. गोविंदराव कोठुळे हे या मंदिराची पूजा-अर्चा करायचे. मात्र सन १९४८-४९ च्या सुमारास शहरातील व्यापारी टेकचंद मंत्री, रामपाल मालाणी, रामकिशन दळवे, गोविंदराव कोठुळे, गोविंदराव राखुंडे, प्रभाकर देवकर, डॉ. बाबुराव मानकेश्वर, ब्रह्माजी धापसे आदी ज्येष्ठ मंडळींच्या पुढाकाराने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.

 Selu Mendhya Ganpati
Nanded Ganeshotsav | ३२५ गणेश मंडळांत विराजमान झाले गणराय; ५५ गावांत ‘एक गाव, एक गणपती’

मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती ही पूर्वमुखी असून शाडू मातीपासून तयार केलेली आहे. त्यावर शेंदुराचा लेप देण्यात आला आहे. सुमारे ४ फूट उंचीची मनमोहक मूर्ती भक्तांना भावते. पुढे कालांतराने प्रसिद्ध डॉक्टर भागचंद मालाणी हे या संस्थेचे अध्यक्ष झाले आणि मंदिरामध्ये आणखी सुविधा भक्तांसाठी उपलब्ध करण्यात आल्या. मूर्तीसमोर चांदीचा मूषकदेखील आहे. सध्या दैनंदिन पूजा, सकाळी व सायंकाळी दोन वेळा आरती, दर गणेशचतुर्थीला गणपती अथर्वशीर्षाचे पाठ होतात. अनेक धार्मिक उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो.

अनंत चतुर्दशीला गणपतीची पालखी काढण्यात येते तर विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी शहरातील सर्व गणपती या मार्गाने जातात. यामुळे सर्व गणेशभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन सिद्धिविनायक संस्थानच्या वतीने करण्यात येते. संस्थेचे सर्व पदाधिकारी आदराने सर्व भाविकांना महाप्रसाद घेण्यास आमंत्रण देतात.

 Selu Mendhya Ganpati
Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाचा थाट पाहून डोळे दिपतील; कोणते देखावे पाहण्यासाठी होतेय गर्दी?

भाविकांच्या सहकार्यातून मंदिरासमोरच तीन मजली भव्य मंगल कार्यालय उभारण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना विवाह आणि इतर कार्यक्रम करण्यास माफक दरात हे मंगल कार्यालय उपलब्ध होऊ शकते. तसेच वर्षभर संस्थानच्या राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांसाठी जागादेखील उपलब्ध झाली.

सिद्धिविनायक गणपतीची मूर्ती पूर्वाभिमुख असल्याने सूर्याचा येणारा पहिला किरण मूर्तीवर पडत असल्याने मूर्ती आणखी विलोभनीय दिसते.

सध्या सिद्धिविनायक गणपती संस्थानचे अध्यक्ष म्हणून श्रीनिवास झंवर व सचिव म्हणून अॅड.सुभाष भरदम कार्यरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news