Pathri Civic Issues : पाण्याअभावी पंचायत समितीचे प्रसाधनगृह महिनाभरापासून बंद

प्रसाधनगृहासाठी स्वतंत्र बोअरवेलची व्यवस्था असतानाही केवळ मोटार बंदमुळे ही सुविधा बंद ठेवण्याची वेळ
Pathri Civic Issues
Panchayat Samiti Toiletpudhari photo
Published on: 
Updated on: 

पाथरी : तालुक्यातील ग्रामीण भागातून विविध शासकीय कामांसाठी पंचायत समिती कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सध्या मूलभूत सुविधेअभावी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पं.स. कार्यालयातील सार्वजनिक प्रसाधनगृह महिनाभरापासून पाण्याअभावी बंद असल्याने नागरिकांची कुचंबणा होत आहे.

विशेष म्हणजे, प्रसाधनगृहासाठी स्वतंत्र बोअरवेलची व्यवस्था असतानाही केवळ मोटार बंदमुळे ही सुविधा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. किरकोळ दुरुस्ती करून प्रश्न मार्गी लागू शकत असताना महिनाभरापासून याकडे दुर्लक्ष होत असल्याने पंचायत समिती प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Pathri Civic Issues
Nashik Weather | नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला! शहरात पारा 10 अंशांवर, निफाडमध्ये 8.2 अंशांची नोंद

पाथरी पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण नागरिकांसाठी महत्त्वाची प्रशासकीय यंत्रणा आहे. घरकुल योजना, ग्रा.पं.ची कामे, विविध शासकीय योजना, रोहयो, कृषी व ग्रामीण विकासाशी संबंधित कामांसाठी दररोज अनेक नागरिक पं.स. कार्यालयात येतात. अनेक नागरिकांना कामानिमित्त तासनतास कार्यालयात थांबावे लागते. मात्र, तेथे नागरिकांसाठी असलेले सार्वजनिक प्रसाधनगृहच बंद असल्याने विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसह येणाऱ्याची मोठी गैरसोय होत आहे.

पं.स.च्या सार्वजनिक प्रसाधनगृहासाठी स्वतंत्र बोअरवेल उपलब्ध आहे. मात्र, त्यावरील पाणी उपसणारी मोटार किरकोळ कारणामुळे बंद पडली. परिणामी प्रसाधनगृहाला पाणीपुरवठा होत नसल्याने ते वापरण्यायोग्य नाही. मोटार दुरुस्त करून पाणीपुरवठा पूर्ववत करणे शक्य असतानाही महिनाभरापासून हा प्रश्न कायम आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजेशी संबंधित सुविधा सुरू ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना त्याकडे लक्ष दिले जात नसल्याची नाराजी आहे.

Pathri Civic Issues
Jayakwadi Project Water Dispute : बी-७० कालव्‍याच्‍या टेलचे शेतकरी पाण्यासाठी पेटले

पंचायत समितीसारख्या महत्त्वाच्या कार्यालयातच प्रसाधनगृह बंदने प्रशासनाच्या सुविधांबाबतच्या दाव्यांचे वास्तव समोर येत आहे. महिनाभरापासून बंद असलेली ही सुविधा तातडीने सुरू करण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याची नागरिकांची तक्रार आहे. बिडीओंनी लक्ष घालून बंद मोटार तातडीने दुरुस्त करावी, पाणीपुरवठा सुरू करावा आणि सार्वजनिक प्रसाधनगृह नागरिकांसाठी खुले करावे, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.