Purna News | राजकीय दबावामुळे जि.प. सदस्या कोमल पारवे यांचे जात प्रमाणपत्र अवैध; न्यायालयात दाद मागणार : श्रीधर पारवे

गौर जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सदस्या कोमल गंगाधर पारवे यांचे मराठा-कुणबी (ओबीसी) जात प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने २४ जुलै रोजी अवैध ठरविले
 जिल्हा जात पडताळणी
जिल्हा जात पडताळणीPudhari News Network
Published on
Updated on

Parbhani ZP Member Komal Parve Caste Certificate Invalidated

पूर्णा : पूर्णा तालुक्यातील गौर जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सदस्या कोमल गंगाधर पारवे यांचे मराठा-कुणबी (ओबीसी) जात प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने २४ जुलै रोजी अवैध ठरविल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. या निर्णयामागे राजकीय दबाव असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा कोमल पारवे यांचे काका श्रीधर पारवे यांनी केला आहे.

या प्रकरणात अर्जदार व तक्रारदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची समितीने पडताळणी करून सुनावणी घेतल्यानंतर जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्याचा निर्णय दिला. मात्र, हा निर्णय वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा श्रीधर पारवे यांनी केला आहे.

 जिल्हा जात पडताळणी
Jintur Parbhani highway accident : जिंतूर-परभणी महामार्गावर एसटीचा भीषण अपघात; ५१ प्रवासी थोडक्यात बचावले

ते म्हणाले, गौर सर्कलमधील जनतेने सामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्याला विश्वासाने निवडून दिले. निवडणुकीतील हा विजय काही विरोधकांना सहन झाला नाही. त्यामुळे काही प्रभावशाली राजकीय व्यक्तींशी संगनमत करून जात पडताळणी समितीवर दबाव टाकण्यात आला आणि प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले.

फाईलमध्ये कोणताही बोगस किंवा बनावट पुरावा नसून सर्व कागदपत्रे सक्षम आणि वैध आहेत. असे असतानाही राजकीय हस्तक्षेपामुळे हा निर्णय देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पराभूत झालेल्या काही राजकीय घटकांनी सूडाच्या भावनेतून हे षडयंत्र रचल्याचा दावाही त्यांनी केला.

 जिल्हा जात पडताळणी
Parbhani news: जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीच्या शस्त्रक्रियेद्वारे सहा वर्षीय बालकाला दिले जीवनदान

श्रीधर पारवे यांनी पुढे सांगितले की, या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढा दिला जाणार असून न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पूर्णा तालुका आणि गौर सर्कलमधील नागरिक आमच्या पाठीशी आहेत. न्यायालयातून सत्याला न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, जात पडताळणी समितीच्या निर्णयानंतर या प्रकरणाची तालुक्यात राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news