Parbhani news: जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीच्या शस्त्रक्रियेद्वारे सहा वर्षीय बालकाला दिले जीवनदान

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि बालकाला जीवनदान मिळाले
Doctors
DoctorsPudhari
Published on
Updated on

परभणी : जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी तत्परता दाखवत सहा वर्षीय बालकावर तातडीची शस्त्रक्रिया करून त्याला नवजीवन दिल्याची घटना घडली. या उल्लेखनीय कार्याबद्दल संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा रुग्णाच्या नातेवाईकांकडून सत्कार करण्यात आला.

मोहम्मद हुसेन मुजाहेद इनामदार (रा. अजीजिया नगर, परभणी) या सहा वर्षीय मुलाला दि. १५ जुलै २०२६ रोजी तीव्र पोटदुखीचा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर सर्जन डॉ. अशोक बन, डॉ. शहेबाज देशमुख तसेच भूलतज्ज्ञ डॉ. सुनील मोरे यांनी रुग्णाची सोनोग्राफी व आवश्यक तपासण्या तातडीने केल्या. मुलाचे अपेंडिक्स फुटल्याने संपूर्ण पोटात पू पसरल्याचे निदर्शनास आले. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्याच दिवशी रात्री ९ वाजता तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि बालकाला जीवनदान मिळाले.

Doctors
Parbhani News | माखणीतील महिला शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीचा आदर्श; रेशीम उद्योगाकडे खांबेगावची दमदार वाटचाल

रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यानंतर दि. २८ जुलै २०२६ रोजी जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दालनात डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सीएस लखमवार, एसीएस सारिका बडे, डॉ. अशोक बन, डॉ. शहेबाज देशमुख, डॉ. सुनील मोरे, वॉर्ड इन्चार्ज सिस्टर संगीता दीपक क्षीरसागर तसेच सिस्टर उमेसलमा यांचा शाल, पुष्पगुच्छ व पेढे देऊन सत्कार करण्यात आला.

Doctors
Parbhani News | कानडखेड येथील विकासकामांची जिल्हा परिषद पथकाकडून चौकशी; ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल

हा सत्कार जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते झाला. तसेच महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार रुग्णाची आई कैकशा बेगम मुजाहेद इनामदार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नईम इनामदार, डॉ. माजिद कुरेशी, खमर हाश्मी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर व संपूर्ण वैद्यकीय पथकाचे मनःपूर्वक आभार मानत त्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news