Parbhani Zilla Parishad : झेडपीच्या सत्तेसाठी महापेच, अध्यक्षासह उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात

भाजप सर्वांत मोठा पक्ष, विरोधकांच्या एकजुटीच्या चर्चा रंगल्या
Parbhani Zilla Parishad
मुख्यमंत्र्यांची शिष्टाई; महायुतीतील तिन्ही घटक पक्ष झेडपीच्या सत्तेत सहभागी होणार !pudhari photo
Published on
Updated on

परभणी : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून 18 मार्च रोजी दुपारी दोन वाजता होणाऱ्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारणात मोठा पेच निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप हा पक्ष 24 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी स्पष्ट बहुमतापासून तो चार जागांनी दूर आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी आता कोणकोणत्या पक्षांमध्ये युती केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेत एकूण 54 सदस्य निवडून आलेले असून सत्तेसाठी किमान 28 सदस्यांचे बहुमत आवश्यक आहे. निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेस 15 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला 6, शिंदे शिवसेनेला 5, काँग्रेसला 3 आणि एक अपक्ष सदस्य विजयी झाला आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे सर्व पक्ष एकत्र आले तर त्यांची एकूण ताकद 29 सदस्यांपर्यंत पोहोचते. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणे उलथवण्याची शक्यता निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्याचे दिसत आहे.

Parbhani Zilla Parishad
Nanded Political News : जिल्हा काँग्रेसमध्ये मोठ्या बदलाचे संकेत!

राजकीय सूत्रांच्या मते, विरोधी पक्षांमध्ये पदवाटपाबाबत प्राथमिक चर्चा सुरू असून अध्यक्षपद शिंदे शिवसेनेला, तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचा प्रस्ताव आहे. तसेच सभापतीपदांमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाला संधी देण्याचा विचारही चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष भाजप विरोधात एकत्र येण्याची रणनीती आखण्यात आल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षपद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने या प्रवर्गातील निवडून आलेल्या सदस्यांमध्येच अध्यक्षाची निवड होणार आहे.

या प्रवर्गातील महिला गटातून जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हाळसा येथून भाजपच्या लता वाकळे, परभणी तालुक्यातील पिंगळी येथून शिंदे सेनेच्या पूजा सावंत, सोनपेठ तालुक्यातील उखळी बुद्रुक येथून राष्ट्रवादीच्या माया मुजमुले तर पूर्णा तालुक्यातील कावलगाव येथून अपक्ष अर्चना ढगे विजयी आहेत. तसेच पुरुष गटातून पूर्णा तालुक्यातील चुडावा येथून भाजपचे भरत घनदाट, ताडकळस येथून ठाकरे गटाच्या केशरबाई जल्हारे आणि पालम तालुक्यातील चाटोरी येथून भाजपचे अमित घनदाट आहेत. त्यामुळे अध्यक्षपदासाठी या नावांभोवतीही राजकीय चर्चेला उधाण आले आहे. पण भाजप वगळता सर्व राजकीय पक्ष एकत्र आले तर शिंदे शिवसेनेच्या पिंगळी गटातील पूजा सावंत यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडू शकते, अशी चर्चा आहे.

Parbhani Zilla Parishad
Nanded crime : जीवन घोगरे पाटलांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

प्रचाराच्या काळात सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली असली तरी भाजप विरोधात इतर पक्षांनी तीव्र भूमिका घेतली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता सत्ता समीकरणात विरोधी पक्ष एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. मात्र दुसरीकडे भाजपकडूनही सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू असून काही सदस्यांचे समर्थन मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संकेत मिळत असून महायुतीतील तीनही घटक पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया 18 मार्च रोजी दुपारी दोन वाजता जिल्हा परिषद सभागृहात पार पडणार असून पीठासन अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या उपस्थित राहणार आहेत. त्या दिवशीच परभणी जिल्हा परिषदेच्या सत्तेचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस जिल्ह्यातील राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news