Nanded crime : जीवन घोगरे पाटलांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

आकांक्षा आत्महत्या प्रकरण ः ग्रामीण पोलिसांची कारवाई; कुटुंबीयांकडून न्याय देण्याची मागणी
Nanded crime
जीवन घोगरे पाटलांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा pudhari photo
Published on
Updated on

नांदेड : शहरातील हडको भागात पद्मश्री शामराव कदम होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयात बीएचएमएसच्या दुसऱ्या वर्षांत शिक्षण घेणा-या 25 वर्षीय विद्यार्थिनीने खासगी वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केली होती. आत्महत्येला जबाबदार असणा-या वसतिगृह चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली होती. यासाठी तरुणीचीच्या नातेवाईकांनी ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले तसेच मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र शुक्रवारी दि. 6 च्या रात्री उशिरा पोलीसांनी अखेर वस्तीगृह चालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन घोगरे पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

या पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाजेगाव येथील आकांक्षा मुंजाजी गायकवाड (वय 25)ही विद्यार्थिनी हडको येथे पद्मश्री शामराव कदम होमिओपॅथी महाविद्यालयात होमिओपॅथीचे बीएचएमएसचे वैद्यकीय शिक्षण घेत होती.जवळच खाजगी वसतिगृहात वास्तव्यास होती. होमियोपॅथीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या आकांक्षाने शुक्रवारी सकाळी वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली.

Nanded crime
Nanded fire : नांदेडमध्ये बाफना परिसरात भीषण आग

घटनेची माहिती मिळताच आकांक्षाचे कुटूंब,नातेवाईक तसेच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. आकांक्षाचा मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. यावेळी आकांक्षाचे वडील, आई व नातेवाईकांनी आकांक्षाच्या मृत्यूस वस्तीगृह चालक जिवन घोगरे पाटील हे असून, त्यांनी आकांक्षाला रुमचे भाडे भरण्यासाठी तगादा लावला होता.

गेल्या आठ ते दहा महिण्यांपासून रुमचे भाडे दिले नसल्याने मुलीचे पाटील यांनी घरभाडे मागणीसाठी त्रास देत होते. त्यामुळे मुलीच्या मृत्यूस जबाबदार असल्याने जिवन घोगरे पाटील यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, पोलीसांनी शवविच्छेदन अहवाल आल्या शिवाय गुन्हा दाखल न करण्याचा पवित्रा घेतला होता. पोलीस आणि आकांक्षाचे कुटुंबीय, नातेवाईकांत बराच तणाव निर्माण झाला होता.

वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. ज्या वस्तीगृहावर आकांक्षा गायकवाड हिने आत्महत्या केली तेथील वसतीिगृह चालक यांचा मनमानी पणा व वसतिगृह विनापरवा आहे, आणि आकांक्षाला वसतिगृह चालकाकडून त्रास होता असे आरोप आकांक्षाच्या कुटुंबीयांनी केले होते. तसेच कांही ऑडिओ क्लिपचा ही विषय असल्याने तसेच वसतिगृह चालक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असल्याने त्यांच्यावर कारवाई होणार नाही अशी भावना झाल्याने कुटुंबीयांनी पोलिसांवर रोष व्यक्त केला.

दरम्यान, रात्री उशिरा वसतिगृह चालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिवन घोगरे पाटील यांच्या विरोधात मुलीच्या आत्महत्येस जबाबदार धरून मुलीला वागणूक चांगली दिली नाही म्हणून ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात केला आहे.

Nanded crime
Beed Crime : प्रदीप फाटे याची कारागृहात रवानगी

अनधिकृत वसतिगृहाचा मुद्दा ऐरणीवर

आकांक्षाच्या आत्महत्येच्या प्रकऱणानंतर अनधिकृत तसेच विनापरवाना वसतिगृह चालविणाऱ्यांचा मुद्दा समोर आला आहे. आकांक्षाच्या नातेवाईकांनी जिवन घोगरे पाटील यांचे वसतिगृह अनधिकृत असून, ते राजकीय बळाचा वापर करुन चावतात. त्यांच्याकडे 45 ते 50 मुली आहेत. त्याठीकाणी कुठली ही सुरक्षेच्या दृष्टीने सोय नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. मुलीच्या आत्महत्ये प्रकरणात पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, मात्र,शहरात सुरु असलेल्या अनधिकृत वसतिगृहांची या निमित्ताने चौकशी ह्‌ोणार का? तसेच वसतिगृहात सुविधा आहेत का हे पाहिले जाणार का असा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news