Mahadev Jankar |…अन्यथा रासपमधून स्वतः परभणी लोकसभा लढविणार : महादेव जानकर

Mahadev Jankar |…अन्यथा रासपमधून स्वतः परभणी लोकसभा लढविणार : महादेव जानकर
Published on
Updated on

परभणी, पुढारी वृत्तसेवा : महायुती व महाविकास आघाडी या दोन्हींकडे लोकसभा निवडणुकीसाठी माढा व परभणी या दोन मतदारसंघांची मागणी केली आहे. परंतु, ही मागणी मान्य न झाल्यास आपण स्वतः रासपच्या तिकीटावर परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यावर ठाम आहोत, अशी घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सोमवारी (दि.११) येथे केली.  Mahadev Jankar

रासपच्या वतीने परभणी लोकसभा विजय निर्धार मेळाव्याचे आयोजन कृष्णा गार्डन मंगल कार्यालयात करण्यात आले होते. त्याप्रसंगी जानकर यांनी रासपची भूमिका स्पष्टपणे मांडली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अक्की सागर होते. आ.डॉ.रत्नाकर गुट्टे, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवटे, कुमार सुशिल, विलास गाडवे, सचिन देशमुख, फारूख बाबा, विष्णू सायगुंडे आदींची उपस्थिती होती. Mahadev Jankar

जानकर यांनी लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना भाजपवर कडाडून टीका केली. आपण भाजपच्या जवळ राहिलो. मात्र पक्षाने मित्र पक्ष म्हणून नेहमीच दडपशाहीचे तंत्र अवलंबिले. कोणत्याही भूमिका घेताना मित्र पक्ष म्हणून सोबत घेतले नाही. परभणीत आ. रत्नाकर गुट्टे हे पक्षाचे एकमेव आमदार निवडून आले. मात्र, भाजपने नेहमीच रासपला धोका दिला आहे, असा आरोप करताना आपणही यापुढे निश्‍चीत भूमिका घेणार आहोत. त्या दृष्टीने लोकसभेसाठी महायुती व महाविकास आघाडीच्या संपर्कात आहोत. या दोन्ही आघाड्यांकडे आपण रासपसाठी माढा व परभणी लोकसभा मतदारसंघाची जागा मागितली आहे. मात्र, या दोन्हींकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. येत्या काही दिवसांत याबाबत निर्णय न झाल्यास रासपच्या तिकीटावर आपण स्वतः परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू, असेही जानकर म्हणाले.

आ.गुट्टे यांनी महायुतीसोबत राहण्याची तयारी आहे. परंतू त्यासाठी लोकसभेची परभणीची जागा ही अट राहणार आहे. या मतदारसंघात रासपची मोठी ताकद असून जानकरांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सक्रीय होवून यश मिळवतील, असा विश्‍वासही व्यक्त करताना आगामी परभणी महापालिकेची निवडणूकही रासप व गुट्टे मित्र मंडळाच्या माध्यमातून लढविली जाणार असल्याचे गुट्टे यांनी सांगितले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news