Parbhani Fuel Shortage | ताडकळस परिसरात डिझेल-पेट्रोलसाठी शेतकऱ्यांच्या पंपावर रांगा

ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर मुबलक इंधन पुरवठ्याची मागणी
Tadkalas Petrol Diesel Issue
Tadkalas Petrol Diesel IssuePudhari
Published on
Updated on

Tadkalas Petrol Diesel Issue

ताडकळस ; ताडकळस परिसरात डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरात एकच पेट्रोल व डिझेल पंप असल्याने इंधनासाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

सध्या शेती मशागतीची कामे वेगाने सुरू असून ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कॅन व कॅंडी घेऊन मोटरसायकलवरून पेट्रोल पंपावर येताना दिसत आहेत. अनेकांना ट्रॅक्टर थेट पंपावर आणणे शक्य नसल्याने ते कॅनमध्ये डिझेल भरून नेत आहेत. मात्र काही ठिकाणी कॅनमध्ये डिझेल देण्यास अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Tadkalas Petrol Diesel Issue
Parbhani diesel shortage news| डिझेलसाठी पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा

या परिस्थितीमुळे पेट्रोल पंपावर बसस्थानकापासून पिगळगडा नदीपर्यंत शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. अशावेळी वेळेवर डिझेल मिळाले नाही तर शेतीची कामे खोळंबण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, प्रशासनाने तसेच संबंधित तेल कंपन्यांनी ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर डिझेलचा सुरळीत आणि मुबलक पुरवठा करावा, तसेच पेट्रोल पंप चालकांनी शेतकऱ्यांची अडवणूक न करता आवश्यकतेनुसार डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ताडकळस व परिसरातील शेतकरी आणि नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news