Parbhani news: पूर्णेतील रेल्वे उड्डाणपुलाजवळील रस्ता बनला दलदलीयुक्त

तेव्हा रस्ते त्वरित दुरुस्त करून वाहतूकीचा अडसर दूर करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे
Parbhani news
Parbhani news
Published on
Updated on

पूर्णा : शहरातील पूर्णा-नांदेड,पूर्णा-अकोला रेल्वे लोहमार्गावर दमरे महारेल रेल्वे विभागांतर्गत उड्डाणपूलाचे बांधकाम करण्यात आले आहे. ह्या रेल्वे उड्डाणपूलाचे काम पूर्ण होवून या पूर्वी तो वाहतुकीसाठी खुलाही करण्यात आला. परंतु, या उड्डाणपूलाशेजारी जे त्या भागातील ग्रामीण आणि शहरी नागरीकाकरीता दोन ठिकाणी पर्यायी रस्ते काढून देण्यात आले. हे रस्ते महारेलने नेहमीसाठी पक्के करुन दिले नसल्यामुळे त्या रस्त्यावर मोठे रुंद खड्डे पडले आहेत.

Parbhani news
Parbhani news: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा! संयुक्त किसान मोर्चाचा आक्रमक आंदोलनाचा इशारा

सदरील रस्ता खड्यात पाणी व चिखल निर्माण झाला असून तिथ हा रस्ता दलदलीयुक्त तयार झाला आहे. येथून वाहतूक करणे अवघड झाले आहे.चिखलात वाहने रुतून अपघात होत आहेत. तरी देखील महारेल रेल्वे विभागाकडून गेली तीन वर्षांपासून दुरुस्ती करण्यात आली नाही. ज्यावेळी उड्डाणपूलाचे बांधकाम हे गॅलकॉन इन्फास्ट्क्चर कंपनीने हाती गेले तेव्हापासून पूल बांधकाम पूर्ण होईपर्यंत पर्यायी रस्ते मजबूत करुन देण्याची हमी महारेलने कंपनीकडे दिली होती.

Parbhani news
Parbhani news: जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीच्या शस्त्रक्रियेद्वारे सहा वर्षीय बालकाला दिले जीवनदान

परंतु, सदर बांधकाम कंपनी कंत्राटदार मालकाने काम पूर्ण होईपर्यंत तब्बल तीन वर्षे रस्ता दुरुस्त करुन दिलाच नाही. त्यानंतर सदर पुलाचे बांधकाम पूर्ण होवून लोकार्पण करुन देखील रस्ता पक्का करुन दिला नाही. रस्ते पक्के करण्यासाठी शहरातील व्यापारी व ग्रामीण भागातील शेतकरी नागरिकांनी संबंधित खात्याकडे अर्ज निवेदन देवून मागणी केली. त्या मागणीची कोणतीही दखल न घेता उलट केराची टोपली दाखवण्यात आली.

Parbhani news
Parbhani News | परीक्षा शुल्काच्या अडथळ्यानंतर तीन महिन्यानंतर अखेर परभणीचा शिष्यवृत्ती निकाल जाहीर!

परिणामी, रेल्वे उड्डाणपूलाचे व जवळील पर्यायी रस्ते वाहतूकी लायक राहिले नाही. त्यामुळे पावसाळ्यात येथे मोठी दलदल निर्माण होत आहे. तसेच उड्डाणपूल शेजारील शहराकडे एस्सार पेट्रोल पंप दिशेच्या रस्त्यावर शुध्दा मोठे खड्डे होवून त्यात पाण्याचे डबके साचले आहे. तोही रस्ता मजबुतीकरण केला नाही. एकंदरीत येथील चिखमलय खड्डेमुक्त रस्त्यामुळे वासतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. तेव्हा रस्ते त्वरित दुरुस्त करून वाहतूकीचा अडसर दूर करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. अन्याथा या भागातील नागरीक मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news