Parbhani news: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा! संयुक्त किसान मोर्चाचा आक्रमक आंदोलनाचा इशारा

आंदोलनकर्त्यांनी नायब तहसीलदार संजय खिल्लारे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले
Parbhani news: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा! संयुक्त किसान मोर्चाचा आक्रमक आंदोलनाचा इशारा
Published on
Updated on

मानवत : २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील घोषणेप्रमाणे राज्य शासनाने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चा आक्रमक झाला आहे. आगामी १० ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.

Parbhani news: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा! संयुक्त किसान मोर्चाचा आक्रमक आंदोलनाचा इशारा
Parbhani news: जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीच्या शस्त्रक्रियेद्वारे सहा वर्षीय बालकाला दिले जीवनदान

या संदर्भातील मागण्यांचे निवेदन सोमवारी (ता. ३) येथील तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सादर करण्यात आले. नायब तहसीलदार संजय खिल्लारे यांनी हे निवेदन स्वीकारले.

Parbhani news: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा! संयुक्त किसान मोर्चाचा आक्रमक आंदोलनाचा इशारा
Parbhani News | माखणीतील महिला शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीचा आदर्श; रेशीम उद्योगाकडे खांबेगावची दमदार वाटचाल

आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या

  1. सातबारा कोरा करा: विधानसभा निवडणुकीतील आकडेवारी व घोषणेनुसार शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करण्यात यावा.

  2. पीक कर्ज वाटप: चालू थकबाकीदार शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्जाचे वाटप करावे.

  3. वन टाईम सेटलमेंट (OTS): इरळदसह तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी 'वन टाईम सेटलमेंट' केले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांनाही पीक कर्ज देण्याचे बँकांना आदेश द्यावेत.

  4. पीक विमा वितरण: अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना २०२५-२६ चा १७,५०० रुपयांचा पीक विमा विनाविलंब देण्यात यावा.

Parbhani news: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा! संयुक्त किसान मोर्चाचा आक्रमक आंदोलनाचा इशारा
Parbhani News | परीक्षा शुल्काच्या अडथळ्यानंतर तीन महिन्यानंतर अखेर परभणीचा शिष्यवृत्ती निकाल जाहीर!

निवेदनावर स्वाक्षरी केलेले प्रमुख शेतकरी व पदाधिकारी

लिंबाजी कचरे, अशोक बुरकुंडे, रमेश साठे, राजाभाऊ काकडे, विष्णू जाधव, अशोक बारहाते, बालासाहेब आळणे, दादासाहेब देशमुख, दत्ता आळणे, गुलाब शेख, देविदास शिंदे, गजानन आळणे, लिंबाजी धनले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news