Purna Ganja Seized | हळद-कापूस पिकात गांजाची बेकायदा लागवड; पोलिसांची छापेमारी, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पूर्णा तालुक्यातील आव्हई शिवारात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड; १०.०६ किलो झाडे जप्त
Purna Cannabis Cultivation
स्थानिक गुन्हे शाखा आणि पूर्णा पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून गांजाची झाडे जप्त केली Pudhari
Published on
Updated on

Purna Cannabis Cultivation

पूर्णा : पूर्णा तालुक्यातील आव्हई शिवारात हळद व कापूस पिकात आंतरपीक म्हणून विनापरवाना गांजाची लागवड केल्याचे उघडकीस आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि पूर्णा पोलिसांच्या संयुक्त पथकाने बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून सुमारे ५ लाख ३ हजार रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त केली.

या कारवाईत काशिनाथ पांडुरंग पवार आणि व्यंकटी बाजीराव पवार (दोघेही रा. आव्हई, ता. पूर्णा, जि. परभणी) यांनी आपल्या शेतात विक्रीच्या उद्देशाने गांजाची लागवड केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पथकाने तलाठ्यांच्या मदतीने संबंधित शेताची पाहणी केली असता हळद व कापूस पिकामध्ये हिरवीगार गांजाची झाडे वाढलेली आढळून आली.

Purna Cannabis Cultivation
Purna Drought | दुष्काळाची छाया गडद: सोयाबीन वाळले; सणासुदीत शेतकऱ्यांचे चेहरे काळवंडले

राजपत्रित अधिकारी आणि दोन पंचांच्या उपस्थितीत ही गांजाची झाडे उपटून त्यांचे वजन करण्यात आले. काशिनाथ पवार यांच्या शेतातून ७.७६० किलो वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. त्यांची किंमत ३ लाख ८८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर व्यंकटी पवार यांच्या शेतातून २.३०० किलो वजनाची गांजाची झाडे आढळून आली. त्यांची किंमत १ लाख १५ हजार रुपये आहे. दोन्ही ठिकाणांहून एकूण १०.०६० किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून त्यांची एकूण किंमत ५ लाख ३ हजार रुपये आहे.

कारवाईदरम्यान दोन्ही संशयित आरोपींचा शोध घेण्यात आला; मात्र ते पोलिसांना मिळून आले नाहीत. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, परभणी पथकातील पोलिस हवालदार देविदास दशरथ बुकरे यांच्या फिर्यादीवरून पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Purna Cannabis Cultivation
Crop Loan Purna | पूर्णेत पीक कर्जाच्या जाचक अटींवरून शेतकरी-बँक व्यवस्थापक आमनेसामने

काशिनाथ पांडुरंग पवार आणि व्यंकटी बाजीराव पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किरकन करीत आहेत.

दरम्यान, आव्हई परिसरात यापूर्वीही बेकायदा गांजा लागवडीविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. ताज्या कारवाईमुळे परिसरात विनापरवाना गांजाची लागवड करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news