Pathri hotel fire Parbhani|हॉटेलला लागलेली आग आटोक्यात, पाथरी नगरपरिषद अग्निशामक दलाची तत्परता; मोठा अनर्थ टळला

pathri hotel fire parbhani- | हॉटेलला लागलेली आग आटोक्यात, पाथरी नगरपरिषद अग्निशामक दलाची तत्परता; मोठा अनर्थ टळला
Pathri hotel fire Parbhani
पाथरी नगरपरिषद अग्निशामक दलाने तत्परता दाखवत हॉटेलला लागलेली आग आटोक्यात आणली.
Published on
Updated on

पाथरी - शहरातील नामदेव नगर येथील आयटीआयसमोरील साई हॉटेलमध्ये दि. २१ सप्टेंबर सोमवार रोजी पहाटे ५.४५ वाजता आग लागली. शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागून आगीचा भडका उडाल्याची माहिती मिळताच पाथरी नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली.

हॉटेलचे मालक नितीन कुमार विष्णू वैराळे तसेच हॉटेल चालक राहुल तौर यांनी अग्निशामक दलाला फोनद्वारे माहिती दिली. कर्तव्यावर असलेले फायरमन शेख शेरू व फायरमन बळीराम गवळे हे अग्निशामक वाहनासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पथकाने युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम सुरू केले.

आगीच्या ठिकाणी असलेले दोन भरलेले गॅस सिलिंडर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात अग्निशामक दलाला यश आले. त्यानंतर शर्थीच्या प्रयत्नांनी आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Pathri hotel fire Parbhani
Parbhani Crime: सासू मेमरी कार्ड आणायला गेली अन् तोवर मानवत बसस्थानकातून नवविवाहितेचे अपहरण; मानवतमधील घटना

अग्निशामक दलाची तत्परता आणि धाडसी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. हॉटेल मालक तसेच परिसरातील नागरिकांनी पाथरी नगरपरिषदेच्या अग्निशामक पथकाचे तत्परतेबद्दल आभार मानले.

Pathri hotel fire Parbhani
Parbhani Tadkalas-Purna bus service: ताडकळस–पूर्णा बससेवा बंद; नागरिकांची गैरसोय; तात्काळ बस सुरु करण्याची मागणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news