Parbhani Crime: सासू मेमरी कार्ड आणायला गेली अन् तोवर मानवत बसस्थानकातून नवविवाहितेचे अपहरण; मानवतमधील घटना

parbhani newlywed abduction | मानवत बसस्थानकातून नवविवाहितेचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
Parbhani Crime: सासू मेमरी कार्ड आणायला गेली अन् तोवर मानवत बसस्थानकातून नवविवाहितेचे अपहरण;  मानवतमधील घटना
file photo
Published on
Updated on

मानवत : सणासुदीच्या खरेदीसाठी सासूसोबत मानवत शहरात आलेल्या १९ वर्षीय नवविवाहितेला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मानवत बसस्थानक परिसरात घडली. याप्रकरणी १८ सप्टेंबर रोजी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवत तालुक्यातील एका गावातील या विवाहितेचा विवाह २०२५ मध्ये झाला होता. सणानिमित्त खरेदी करण्यासाठी ती आपल्या सासूसोबत मानवत शहरात आली होती. खरेदीदरम्यान सासू मेमरी कार्ड खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेली असता, विवाहिता बसस्थानक परिसरात थांबली होती.

मात्र, काही वेळाने सासू परत आल्यानंतर संबंधित विवाहिता तेथे आढळून आली नाही. त्यानंतर नातेवाईकांसह परिसरात शोधाशोध करण्यात आली. विविध ठिकाणी चौकशी करूनही तिचा कोणताही मागमूस लागला नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे.

Parbhani Crime: सासू मेमरी कार्ड आणायला गेली अन् तोवर मानवत बसस्थानकातून नवविवाहितेचे अपहरण;  मानवतमधील घटना
Parbhani Tadkalas-Purna bus service: ताडकळस–पूर्णा बससेवा बंद; नागरिकांची गैरसोय; तात्काळ बस सुरु करण्याची मागणी

या प्रकरणी पतीच्या फिर्यादीवरून मानवत पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news