Parbhani News | गॅस एजन्सींची 'कृत्रिम टंचाई'; ताडकळस परिसरात घरगुती सिलेंडरचा उघड काळाबाजार, पुरवठा विभाग सुस्त

सामान्य ग्राहकाने गॅस बुक केल्यास एजन्सीकडून "सिलेंडर उपलब्ध नाही" असे सांगून दोन आठवडे ताटकळत ठेवले जाते
LPG Cylinder
LPG CylinderPudhari
Published on
Updated on

ताडकळस : ताडकळस आणि परिसर सध्या गॅस सिलेंडरच्या भीषण टंचाईचा सामना करत आहे. मात्र, ही टंचाई खरोखरच आहे की ती कृत्रिमरीत्या निर्माण केली गेली आहे, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. एकीकडे अधिकृत ग्राहकांना १५-१५ दिवस वाट पाहावी लागत असताना, दुसरीकडे विनापरवाना नफेखोरांना मात्र छुप्या मार्गाने हवा तेवढा गॅस पुरवठा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

LPG Cylinder
LPG Price Hike: ग्राहकांना मोठा झटका! LPG सिलेंडरच्या दरात मोठी वाढ; कमर्शियल गॅस तब्बल ९९३ रुपयांनी महागला

हॉटेल आणि खानावळींना चढ्या दराने विक्री

ताडकळस परिसरामध्ये पिंगळी, परभणी आणि पूर्णा येथील गॅस एजन्सींमार्फत अधिकृत गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जातो. येथे नोंदणीकृत ग्राहकांची संख्या मोठी आहे. असे असतानाही, परिसरातील काही अवैध व्यापाऱ्यांकडे घरगुती गॅस सिलेंडरचा मोठा साठा उपलब्ध असतो. हे व्यापारी हॉटेल, खानावळी आणि इतर व्यावसायिक ठिकाणी १८०० ते २००० रुपये या अवाढव्य दराने सिलेंडरची खुलेआम विक्री करून गब्बर होत आहेत.

LPG Cylinder
Bhokardan LPG shortage : भोकरदन तालुक्यात घरगुती गॅसचा तुटवडा

अवैध साठा येतोच कुठून?

सामान्य ग्राहकाने गॅस बुक केल्यास एजन्सीकडून "सिलेंडर उपलब्ध नाही" असे सांगून दोन आठवडे ताटकळत ठेवले जाते. मग त्याच वेळी कोणत्याही प्रकारचा परवाना नसलेल्या या काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे सिलेंडरचा खच कसा पडतो? त्यांना हा माल नक्की पुरवतो कोण? गॅस एजन्सी आणि या अवैध विक्रेत्यांचे काही साटेलोटे आहे का? असे अनेक गंभीर प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

LPG Cylinder
Ratnagiri News : दापोली तालुक्यावर मोठे इंधन संकट

पुरवठा विभागाकडून कारवाईची मागणी

विनापरवाना आणि अवैध मार्गाने साठा करून सर्वसामान्य ग्राहकांची लूट करणाऱ्या या व्यापाऱ्यांना जणू रान मोकळे झाले आहे. या गॅस सिलेंडरच्या काळाबाजारामुळे प्रामाणिक ग्राहकांचे बजेट कोलमडले असून, पुरवठा विभागाने तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित एजन्सी आणि अवैध विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news