Bhokardan LPG shortage : भोकरदन तालुक्यात घरगुती गॅसचा तुटवडा

गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा
Bhokardan LPG shortage
भोकरदन तालुक्यात घरगुती गॅसचा तुटवडाpudhari photo
Published on
Updated on

आन्वा : भोकरदन शहरासह तालुक्यात घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची सकाळपासूनच लांबच लांब रांग लागलेली दिसून येत आहे. अनेक गॅसधारक सकाळपासून ताटकळत बसले असून, वेळेवर गॅस मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

तालुक्यातील गॅस ग्राहकांचे म्हणणे आहे की, गॅस बुकिंग करूनही वेळेत सिलिंडर मिळत नाही. त्यामुळे दैनंदिन स्वयंपाकाची कामे खोळंबली आहेत. विशेषतः कामगार व नोकरदार वर्गाला याचा मोठा फटका बसत आहे. दरम्यान, संबंधित गॅस वितरकांकडून पुरवठा उशिरा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून गॅसचा सुरळीत पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Bhokardan LPG shortage
Satara News: युद्धाच्या झळीने पुन्हा पेटल्या चुली...!

अमेरिका -इराण युद्धामुळे आखाती देशातून होणारा गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे व्यावसायिकांवर तसेच घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस पुरवठा उपलब्ध नसल्यामुळे हॉटेल्स व चहाच्या टपऱ्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सिलिंडरचा तुटवडा असल्यामुळे काळ्या बाजारात गॅस अवाच्या सव्वा किमतीने विकला जात असल्याचे बोलले जात आहे.

Bhokardan LPG shortage
Kalyan Dombivli | कल्याण-डोंबिवलीत गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा: मध्य पुर्वेतील तणावाचा स्थानिक पातळीवर परिणाम!

रेशनवर मिळणारे तसेच काही किराणा मालाच्या दुकानावर मिळणारे केरोसिन या आधीच गेली अनेक वर्षे हद्दपार झाले त्या पाठोपाठ स्टोव देखील खप नसल्याने बाजारातून गायब झाले त्यामुळे शहरातील नागरिक व मोल मजुरी करणारे इतर प्रांतांतून आलेले नागरिक यांच्यावर गॅस सिलिंडरचा तुटवड्यामुळे संकट कोसळून उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे.

  • ग्रामीण भागात काही ठिकाणी चुलीचा किंवा लाकडाचा वापर तर हॉटेल व्यावसायिकांनी इलेक्ट्रिक शेगडीचा वापर सुरू केला आहे. ग्रामीण भागात उज्ज्वला योजनेंतर्गत लाखो गरीब महिलांना मोफत तसेच सवलतीच्या दरात गॅस कनेक्शन दिले गेले आहेत. गॅस तुटवड्यामुळे लाकडांची मागणी वाढली आहे. एलपीजी गॅसचा तुटवडा, सिलिंडर मिळण्यात येणाऱ्या अडचणी, काळाबाजार यामुळे अनेक कुटुंबांना सिलिंडर मिळणं कठीण झालं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news