

Manwath Market Committee Election
मानवत : येथील खरेदी-विक्री संघाच्या १९ जागांसाठी २१ जून रोजी पार पडलेल्या निवडणुकीत ॲड. सतीश बारहाते यांच्या नेतृत्वाखालील ‘बळीराजा विकास परिवर्तन पॅनल’ने दणदणीत विजय मिळवत सत्ता काबीज केली. तर पंडितराव चौकट यांच्या ‘शेतकरी विकास पॅनल’ला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीत सहकारी संस्था मतदारसंघातून ॲड. सतीश बारहाते, सुरेश दहे, दत्तात्रय जाधव, रुस्तुम मांडे, दत्तात्रय पाते आणि शिवाजी वरखडे हे उमेदवार विजयी झाले. वैयक्तिक मतदारसंघातून ॲड. मोहन बारहाते, नानासाहेब भिसे आणि दत्तराव लाडाने यांनी विजय मिळवला.
ग्रामपंचायत मतदारसंघातून संजीवनी काळे व उमा मगर, महिला राखीव मतदारसंघातून रेखाबाई देशमुख, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून अर्जुन तुपसमुंद्रे, इतर मागासवर्ग मतदारसंघातून आबासाहेब घाटूळ तसेच विजा/भज मतदारसंघातून शेषराव दहे असे एकूण १५ उमेदवार ‘बळीराजा विकास परिवर्तन पॅनल’कडून निवडून आले.
तर ‘शेतकरी विकास पॅनल’कडून वैयक्तिक मतदारसंघातून माणिक बारहाते, पंडितराव चोखट, पंढरीनाथ यादव आणि महिला राखीव मतदारसंघातून माधुरी कदम असे एकूण चार उमेदवार विजयी झाले.
निकाल जाहीर झाल्यानंतर ‘बळीराजा विकास परिवर्तन पॅनल’च्या प्रमुखांनी कोणताही जल्लोष न करता यशवाडी येथे झालेल्या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी मतदारांचे आभार मानत हा विजय विकासकामांना अधिक गती देण्यासाठी असल्याचे सांगितले.