Manwath Municipal Politics : मानवतला स्थायी व विशेष समिती सभापतीच्या निवडीमध्ये राष्ट्रवादीचा वरचष्मा, विरोधक गैरहजर
मानवत : मानवत नगरपालिकेच्या स्थायी आणि विषय समिती सभापतींच्या निवडीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. शुक्रवारी (दि. २३) पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत विरोधी शिवसेना-भाजप युतीचे पाचही नगरसेवक गैरहजर राहिले. परिणामी, सर्व समिती सभापती आणि सदस्य पदांवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे.
नगरपालिका सभागृहात पिठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार आणि मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही विशेष बैठक पार पडली.
नवनियुक्त सभापतींची यादी
स्थायी समिती : राणी लाड (नगराध्यक्षा)
नियोजन व विकास समिती : डॉ. अंकुश लाड (उपाध्यक्ष)
सार्वजनिक बांधकाम समिती : संजयकुमार बांगड
पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती : डॉ. देवयानी दहे
स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती : रेखा हालनोर
महिला व बालकल्याण समिती : अनुराधा वासुंबे
उपस्थिती आणि अनुपस्थिती
या निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नगरसेवक आणि शिवसेना उबाठा गटाचे दीपक बारहाते यांच्यासह स्वीकृत सदस्य उपस्थित होते. मात्र, शिवसेनेचे गटनेते ॲड. विक्रमसिंह दहे, विभा भदर्गे, शेख जवेरिया बेगम, मोहमद बिलाल बागवान आणि भाजपचे शैलेंद्र कत्रूवार हे पाच नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

