Manwat Panchayat Samiti | मानवत पं. स सभापतीपदी राष्ट्रवादीच्या ललिता निर्वळ, उपसभापतीपदी सूरज काकडे बिनविरोध

पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत
Lalita Nirwal  Chairperson Suraj Kakade Deputy Chairperson
Lalita Nirwal Chairperson, Suraj Kakade Deputy ChairpersonPudhari
Published on
Updated on

Lalita Nirwal Chairperson Suraj Kakade Deputy Chairperson

मानवत : मानवत पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ललिता उद्धवराव निर्वळ तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचेच सूरज सुंदर काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सभापती व उपसभापती पदासाठी मंगळवारी (ता. १०) दुपारी दोन वाजता पंचायत समितीच्या सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. सकाळी १० ते १२ या वेळेत अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली. पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असल्याने सभापती पदासाठी ताडबोरगाव गणातून निवडून आलेल्या ललिता निर्वळ तसेच उपसभापती पदासाठी पाळोदी गणातून विजयी झालेल्या सूरज काकडे यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे मतदानाची गरज न पडता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर केली.

Lalita Nirwal  Chairperson Suraj Kakade Deputy Chairperson
Parbhani News | नागापूर येथे मातंग समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी; दोन–तीन महिन्यांत महसुली अभिलेखात दहा गुंठे जागेची नोंद

निवड जाहीर झाल्यानंतर आमदार राजेश विटेकर, बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर आणि उपसभापती नारायण भिसे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचा पंचायत समिती सभागृहात सत्कार करण्यात आला.

नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत एकूण आठ गणांपैकी सहा गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे, तर दोन गणांमध्ये शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार विजयी झाले होते. सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने राष्ट्रवादीच्या ललिता निर्वळ आणि ज्योती शिंदे या इच्छुक होत्या. मात्र पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानुसार ललिता निर्वळ यांची निवड करण्यात आली.

Lalita Nirwal  Chairperson Suraj Kakade Deputy Chairperson
Manwat Crime | मानवत शहरात अज्ञातांकडून दुचाकी पेटवून दिल्याच्या घटनेने खळबळ

या सभेला पिठासीन अधिकारी म्हणून निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार यांनी काम पाहिले. बैठकीस तहसीलदार पांडुरंग माचेवाड, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे तसेच पंचायत समितीचे नवनियुक्त सदस्य ज्योती शिंदे, सर्जेराव हरकळ, उर्मिला रणखांबे, शहानुरखा मुनीरखा पठाण, प्रमिला उकलकर आणि सरस्वती नाईक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news