Bike Fire Manwat
अज्ञात व्यक्तीने सुपेकर यांच्या घरासमोर उभी असलेली दुचाकी पेटवून दिलीPudhari

Manwat Crime | मानवत शहरात अज्ञातांकडून दुचाकी पेटवून दिल्याच्या घटनेने खळबळ

Parbhani Crime News | पहाटेच्या सुमारास वाहनाला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांची घटनास्थळी धाव
Published on

Bike Fire Manwat

मानवत : मानवत शहरातील लाड गल्ली, कृष्ण मंदिर परिसरात राहणारे किशोर चंद्रकांत सुपेकर यांची घरासमोर उभी असलेली दुचाकी अज्ञाताने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना आज (दि. ८) पहाटे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साधारण अडीच ते चार वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने सुपेकर यांच्या घरासमोर उभी असलेली होंडा कंपनीची (मॉडेल २०११) ही दुचाकी पेटवून दिली. या घटनेत दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जळालेल्या दुचाकीचा नोंदणी क्रमांक एमएच २२ वाय ०१५७ असा आहे.

Bike Fire Manwat
Parbhani crime news | पोलीस हवालदार लाचलुचपतच्या जाळ्यात; ८ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

पहाटेच्या सुमारास वाहनाला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत दुचाकी मोठ्या प्रमाणात जळून नुकसान झाले होते. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अंदाजे ३० ते ३५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news