Manwat Gas Shortage | मानवत तालुक्यासह शहरात घरगुती गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई

ऑनलाइन बुकिंग करून पैसे भरल्यानंतरही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी
Manwat domestic gas supply issues
नागरिकांना भर उन्हात तासन्तास रांगेत उभे राहून गॅस सिलेंडरची प्रतीक्षा करावी लागत आहेPudhari
Published on
Updated on

Manwat domestic gas supply issues

मानवत : मानवत तालुक्यासह शहरात घरगुती गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना भर उन्हात तासन्तास रांगेत उभे राहून प्रतीक्षा करावी लागत आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

शहरातील गॅस पुरवठा इंडेन अंतर्गत कार्यरत असलेल्या एकमेव गॅस एजन्सीमार्फत केला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाला असून मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. ऑनलाइन बुकिंग करून पैसे भरल्यानंतरही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून होत आहेत.

Manwat domestic gas supply issues
Manwat Bike Fire | मानवत शहरात पुन्हा २ दुचाकी जाळल्या; तिसऱ्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बुकिंगनंतर ग्राहकांना एजन्सीकडून पावती दिली जाते आणि त्या आधारे गोडाऊनवर जाऊन सिलेंडर घ्यावा लागतो. मात्र, पावती घेण्यासाठीही एजन्सीसमोर मोठ्या रांगा लागत आहेत. मंगळवार, २४ मार्च रोजी गोडाऊनसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. या रांगांमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता.

परीक्षेचा कालावधी सुरू असतानाही विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून सिलेंडरसाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, भर उन्हात तासन्तास थांबल्यानंतरही अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

Manwat domestic gas supply issues
Manwat Sand Mining | गोदावरी पात्रात अवैध वाळू उपसा; दोन युवकांचे आमरण उपोषण

दरम्यान, नोंदणी केलेल्या ग्राहकांना गुरुवार किंवा शुक्रवारी सिलेंडर मिळेल, असे एजन्सीकडून सांगण्यात येत आहे. मात्र, पुरवठा सुरळीत कधी होणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news