Manwat Bike Fire | मानवत शहरात पुन्हा २ दुचाकी जाळल्या; तिसऱ्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

संभाजीनगर परिसरात अज्ञात व्यक्तीने दोन मोटारसायकली पेटवून दिल्याने खळबळ
Manwat   Bike Burning Incidents
Manwat 2 Bike Burning IncidentsPudhari
Published on
Updated on

Manwat Bike Burning Incidents

मानवत : मानवत शहरातील संभाजीनगर परिसरात अज्ञात व्यक्तीने दोन मोटारसायकली पेटवून दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. 21) मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. नगरेश्वर मंदिरासमोर उभ्या असलेल्या या दुचाकी काही क्षणांतच आगीत पूर्णतः जळून खाक झाल्या. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहितीनुसार, पुरुषोत्तम शिवाजी भायेकर यांची दुचाकी (क्र. एमएच २२ बीएफ ६४०४) आणि स्वप्नील भिकु घोडके यांची दुचाकी (क्र. एमएच १७ एटी ५४४४) या दोन मोटारसायकली मंदिरासमोर पार्क करण्यात आल्या होत्या. मध्यरात्री अज्ञाताने या वाहनांना आग लावली.

Manwat   Bike Burning Incidents
Parbhani News : नवीन यंत्राद्वारे होणार सेप्टिक टँकसह मलजल वाहिन्यांची स्वच्छता

घटनेची माहिती मिळताच रात्र गस्तवरील पोलीस कर्मचारी विजय लबडे, किसन पतंगे, प्रमोद देवकते आणि नारायण सोळंके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांत वाहनांना मुद्दामहून आग लावण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी 8 मार्च रोजी लाड गल्ली येथील किशोर सुपेकर यांची घरासमोरील मोटारसायकल जाळण्यात आली होती, तर 18 मार्च रोजी त्याच परिसरातील शुभम दहे यांची नवी रिक्षा पेटवून देण्यात आली होती. या घटनांमध्ये अद्याप आरोपींचा मागोवा लागलेला नसल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Manwat   Bike Burning Incidents
Parbhani news | तरंगल शिवारात रब्बी ज्वारीवर 'काणी'चे सावट; सोन्यासारखी कणसं काळवंडली

सध्या पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, नागरिकांनी सतर्क राहून संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news