Parbhani Crime | मानवत तालुक्यात साडेसात लाखांचा गुटख्यासह ५ लाखांचे वाहन जप्त

विशेष पोलीस महानिरीक्षक पथकाची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Parbhani Crime News
Parbhani Crime NewsFile Photo
Published on
Updated on

Manvat police gutkha raid

मानवत : विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या पथकाने मानवत पोलिसांच्या मदतीने तालुक्यातील हात्तलवाडी येथे रविवारी (दि. १५) मध्यरात्री सुमारे २ वाजता प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक उघडकीस आणली. या कारवाईत अंदाजे १२ लाख ३७ हजार ५८४ रुपयांचा गुटखा व पानमसाला तसेच पाच लाख रुपये किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरात पोलीस गस्त घालत असताना संशयित चारचाकी वाहनातून गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने पाठलाग करून हात्तलवाडी (ता. मानवत) येथे एमएच २२ एएन ३५१३ क्रमांकाचे मालवाहू वाहन अडवले. तपासणीअंती वाहनात मोठ्या प्रमाणावर गुटखा व पानमसाला साठा आढळून आला.

Parbhani Crime News
Parbhani Crime News : जिंतूर बाजार समितीच्या हौदात आढळला मृतदेह

वाहनचालक सर्जेराव प्रल्हादराव शिंदे (रा. हात्तलवाडी, ता. मानवत) याची चौकशी केली असता मालाबाबत समाधानकारक माहिती देता आली नाही. त्यामुळे पंचनामा करून सुमारे ७ लाख ३४ हजार २०० रुपयांचा ‘गोवा’ ब्रँड गुटखा (एकूण ३६७१ पुडे), १ हजार २२४ रुपयांचा ‘डायरेक्टर’ गुटखा (४ पुडे) व २ हजार १६० रुपयांचा ‘माणिकचंद’ गुटखा (६ पुडे) असा साठा जप्त करण्यात आला. तसेच पाच लाख रुपये किंमतीचे Ashok Leyland कंपनीचे ‘बडा दोस्त’ मॉडेल मालवाहू वाहनही जप्त करण्यात आले.

सदर माल शासनाने प्रतिबंधित केलेला असून मानवी आरोग्यास घातक असल्याची माहिती असतानाही विक्रीच्या उद्देशाने वाहतूक केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी सर्जेराव शिंदे (रा. हात्तलवाडी, ता. मानवत) व अवेज खान (रा. पठाण गल्ली, पाथरी) यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) अन्वये मानवत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील करीत आहेत.

Parbhani Crime News
Parbhani Crime News : विद्यार्थ्याचे अपहरण करीत बेदम मारहाण, १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय, नांदेड यांच्या पथकाने केली. पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी. माचेवाड, पोलीस हवालदार खानसोळे, जिंकलवाड, पोलीस शिपाई धुमाळ, चालक पोलीस शिपाई गवळी तसेच मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई लटपटे व दुधाटे यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news