परभणी : वरपूडकर, बोडर्डीकर, विटेकर, गुट्टे बिनविरोध

Parbhani Bank Election-परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक; तब्बल आठ मतदारसंघांत चुरशीची होणार लढाई
Parbhani Bank Election
Parbhani Bank Election
Published on
Updated on

परभणी, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १३ संचालक बिनविरोध निवडून आले असून उर्वरित ८ मतदारसंघांत निवडणूक होणार आहे. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, माजी आ. सुरेश वरपूडकर, आ.राजेश विटेकर, आ.डॉ. रत्नाकर गुट्टे हे दिग्गज बिनविरोध निवडून आले असून या निवडणुकीत खासदार व आमदार राहिलेल्या अनेक लोकप्रतिनिधींनी माघार घेतल्याचे दिसून आले.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालकपदाच्या २१ जागा निवडून देण्यासाठी दि.१९ जुलै रोजी मतदान होणार आहे. परंतु तब्बल १३ संचालक बिनविरोध निवडून आल्यामुळे निवडणूक मतदारांच्या दृष्टीने रंगतदार होणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. परभणी जिल्हयातील मानवत, पूर्णा तर हिंगोली जिल्हयातील वसमत, हिंगोली, कळमनूरी या प्राथमिक कृषी पतपूरवठा, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मतदारसंघात निवडणूक होणार आहे.

Parbhani Bank Election
SIR 2026 Maharashtra | सकाळी अध्यापन, दुपारी मतदार पुनर्निरीक्षण, रात्री ऑनलाइन काम : कामाच्या ताणाने BLO शिक्षक हैराण

अनूसूचीत जाती, अनूसूचीत जमाती, विमुक्त व भटक्या जमाती, इतर शेती संस्था मतदारसंघात निवडणूक होणार असून अनेकांची बिनविरोध निवडून येण्याचे स्वप्न भंगल्यामुळे त्यांना निवडणूकीला सामोरे जावे लागणार आहे. प्राथमिक कृषी पुरवठा मतदारसंघ परभणी तालुक्यातून माजी आ. सुरेश वरपूडकर बिनविरोध निवडून आले असून त्यांचे पूत्र समशेर वरपूडकर यांनी या मतदारसंघातून गुरूवारी माघार घेतली आहे. जिंतूर तालुका मतदारसंघातून माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर बिनविरोध निवडून आले असून तेथे त्यांचे बंधू गंगाधर कदम-बोडर्डीकर यांनी माघार घेतली आहे.

Parbhani Bank Election
Purna Earthquake | पूर्णा तालूक्यात भुकंपाचा हादरा; बुधवारी मध्यरात्री बसलेल्या धक्क्याने जनता भयभीत!

पालम तालुक्यातून तुषार दुधाटे यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे ते यापुर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. गंगाखेड तालुक्यातून आ. रत्नाकर गुट्टे यांचा एकमेव अर्ज असल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत. मानवत तालूका मतदारसंघातून जयश्री जाधव या एकमेव महिला उमेदवाराने माघार घेतली असून तेथे अमोल कदम, आकाश चोखट हे निवडणुक रिंगणात राहिले आहेत. पूर्णा तालुका मतदारसंघातून चार उमेदवारांनी माघार घेतली असून तेथे आठ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिलेले आहेत. पाथरी तालुका मतदारसंघातून तीन उमेदवारांनी माघार घेत, येथेही निवडणूक होणार आहे. सेलू तालुका मतदारसंघातून राजेंद्र लहाने यांनी माघार घेतल्यामुळे पालकमंत्री मेघना बोर्डीकर बिनविरोध निवडून आल्या.

अनूसूचीत जाती जमाती मतदारसंघात चार उमेदवारांनी माघार घेतली असून तब्बल १४ उमदेवार रिंगणात आहेत. विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून ११ उमेदवारांनी माघार घेतली असून १० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये बँकेचे माजी संचालक स्वराजसिंह परिहार, दत्ता मायंदळे यांचा समावेश आहे. इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून ९ उमेदवारांनी माघार घेतली असून बँकेचे माजी संचालक भगवान वाघमारे हे बिनविरोध निवडून आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news