Purna Earthquake | पूर्णा तालूक्यात भुकंपाचा हादरा; बुधवारी मध्यरात्री बसलेल्या धक्क्याने जनता भयभीत!

मध्यरात्री १ वाजून ३७ वाजता भूकंप, ४.६ रिस्टर स्केल तीव्रता नोंद
भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर भयभीत होऊन जनावरे इकडे तिकडे धावत होती.
भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर भयभीत होऊन जनावरे इकडे तिकडे धावत होती.
Published on
Updated on

पूर्णा : शहरासह तालूका परिसरात ता ८ जुलै बुधवारी मध्यरात्रीनंतर १ वाजून ३७ मिनीटांच्या दरम्यान भुकंपाचा हादरा बसला. सदरील भुकंपचा धक्का जाणवताच गाढ झोपेत असलेली जनता खडबडून जागे होत उठून बसली. शेजारी पाजारी जागे झालेल्या लोकांतून एकच कुजबुज ऐकू येवून लोक घराबाहेर आले.

त्यांनी जागं झालेल्या नागरिकांना विचारले असता, आम्हाला भुकंपाचा हादरा बसला, तुम्हाला कळालं की नाही?असं एकमेकांना प्रश्न केला असता सर्वांकडूनच होकार आला. सदरील भुकंपाची तिव्रता ४.६ रिस्टर स्केलवर नोंद झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. हिंगोली जिल्हा वसमत तालुक्यातील शिरळी गावाशेजारी व पांगरा शिंदे भागात केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे.

त्या भागात तर तिन चार वेळा भुकंपाचे धक्के बसल्याची माहिती आली आहे. सदरील भुकंपाचे धक्के बसल्यानंतर कुत्रे भुंकत रस्त्याने सुटले होते. काही पशू जनावरे देखील भयभीत होवून इकडे तिकडे पळाली. या आधी मागच्या काही महिन्याखाली देखील भुकंपाचा हादरा बसला होता.त्यावेळी शुध्दा वसमत मधील पांगरा शिंदे केंद्रबिंदू होते.आता तिथं मोठा भूकंप होईल का?असी भिती नागरीकातून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news